शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

राज्यात आयटीआय प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ मिळेना, २६,५९४ जागा रिक्त

By admin | Updated: September 20, 2016 20:07 IST

राज्यातील आयटीआयच्या २६ हजार ५९४ जागा रिक्त असतानाही फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे.

चेतन ननावरे

मुंबई, दि  : राज्यातील आयटीआयच्या २६ हजार ५९४ जागा रिक्त असतानाही फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे. कारण कौशल्य विकास आणि उद्योजकता केंद्रीय मंत्रालयाच्या महासंचालकांनी २५ सप्टेंबरपर्यंत राज्यांतील आयटीआय प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचे आदेश १२ सप्टेंबर रोजी सर्वराज्यांना दिले आहेत. मात्र राज्यात प्रवेश प्रक्रियेचे बस्तान गुंडाळलेल्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने अद्याप प्रवेशाला मुदतवाढ दिलेली नाही.

संचालनालयाच्या कामचुकारपणामुळे दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. बारावीच्या फेरपरीक्षेला सुमारे सव्वालाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर दहावीच्या फेरपरीक्षेला नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दीड लाखांच्या घरात आहे. अशा परिस्थितीत फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून आयटीआयमधील दहावी, बारावी उत्तीर्ण अर्हता असलेल्या ट्रेडला पर्याय दिला जातो. मात्र राज्यातील आयटीआय प्रवेश प्रक्रिया ३१ आॅगस्ट रोजी संपुष्टात आली आहे. याउलट दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल ३० आॅगस्टला लागला असून, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल २३ आॅगस्टला लागला आहे. त्यामुळे या सर्वच विद्यार्थ्यांना व्यवसायिक प्रशिक्षणाची प्रवेशाची संधी देण्याऐवजी शासनाकडून खच्चीकरण केले जात आहे.

या परिपत्रकासंदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्याचे महाराष्ट्र राज्य खासगी आयटीआय कर्मचारी, प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते यांनी सांगितले. ते म्हणाले की, प्रशिक्षण मंत्रालयाचे उपमहासंचालकदिपंकर मलिक यांनी राज्यातील संचालकांना १२ सप्टेंबर, २०१६ रोजी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र एक आठवडा झाला, तरी शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. प्रवेशासाठी आवश्यक आॅनलाईनवेबसाईट अद्याप बंद आहे. त्यामुळे विद्यार्थी प्रवेशासाठी आयटीआयमध्ये येत असले, तरी शासनाने बंद ठेवलेल्या वेबसाईटमुळे प्रवेश देता येत नाही.........................राज्यातील शासकीय व अनुदानित आणि खासगी आयटीआयमधील यंदाच्या रिक्त जागांचा आकडा -आयटीआयचा प्रकार रिक्त जागाशासकीय ७ हजार ७५२खासगी १८ हजार ८४२एकूण २६ हजार ५९४.............................फेरपरीक्षेतील विद्यार्थ्यांची सद्यस्थितीइयत्ता विद्यार्थी संख्याबारावी उत्तीर्ण ३२ हजार ९२१बारावी अनुत्तीर्ण ९० हजार २५३दहावी उत्तीर्ण ३९ हजार ९९४दहावी अनुत्तीर्ण १ लाख ३ हजार ९०३.....................चौकट-यासंदर्भात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दयानंदमेश्राम आणि संबंधित विभागाचे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना संपर्कसाधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही......................