मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेश परीक्षेच्या (पेट) वेळापत्रकात बदल करत प्रशासनाने अर्ज भरण्यासाठी १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. प्रवेश परीक्षाही आता ३ जानेवारी २०१६ रोजी घेण्यात येणार आहे.विविध विषयांमध्ये पीएच.डी. करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद पाहून विद्यापीठाने पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल केला आहे. ३ जानेवारी २०१६ रोजी ही पेट परीक्षा दुपारी २ ते सायं. ५ या कालावधीमध्ये आयोजित केली आहे. परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य वर्गातील उमेदवारांना १ हजार रुपये शुल्क असणार असून, मागासवर्गीय उमेदवारांना ५० टक्के सूट देण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी पेट परीक्षा प्रक्रियेत गोंधळ झाल्याची चर्चा ही केवळ अफवा असल्याचा खुलासाही विद्यापीठाने केला आहे.
पेट परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ
By admin | Updated: December 1, 2015 01:34 IST