शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

"एप्रिलच्या कोट्यातील साखर विक्रीस मुदतवाढ द्या; मेसाठी मर्यादित कोटा जाहीर करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 07:21 IST

राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाची मागणी

कोल्हापूर : सहकारी साखर कारखान्यांकडील खुल्या बाजारात विक्रीसाठी दिल्या गेलेल्या साखर कोट्यापैकी जवळपास ५० टक्के कोटा शिल्लक असतानाच केंद्र सरकारने एप्रिलसाठी २२ लाख टन इतका विक्रमी साखरेचा कोटा जाहीर केला आहे. या कोट्यातील शिल्लक साखरेसाठी मुदतवाढ देण्यात यावी, तसेच मे महिन्यासाठी मर्यादित कोटा जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाने केली आहे.केंद्र शासनाकडून गेल्या सहा महिन्यांत दिला गेलेला सहकारी साखर कारखान्यांच्या कोट्यापैकी निम्म्याच साखरेची प्रत्यक्ष विक्री होऊ शकली नसल्याने हे कारखाने अडचणीत आले आहेत. या उलट उत्तर प्रदेशातील बहुतांशी खाजगी क्षेत्रातील कारखान्यांनी त्यांना मिळालेल्या कोट्यापेक्षा अधिक साखरेची विक्री केली आहे.पाच वर्षांतील एप्रिलमधील विक्रमी विक्री कोटाकेंद्र सरकारने एप्रिलसाठी जाहीर केलेला २२ लाख टनाचा साखर कोटा गेल्या पाच वर्षांतील विक्रमी आहे. गेल्या पाच वर्षांतील तो सरासरी १८ लाख टन होता. मार्च २०२० मध्ये उद्भवलेल्या कोरोना संसर्गाच्या लाटेमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे सर्व मिठाई, थंड पेये, चॉकलेट्स, बिस्किटे, सरबते यांचे व्यवसाय ठप्प झाल्याने साखरेची विक्री जवळपास १० लाख टनांनी कमी झाली होती. आताही तशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता दिसू लागली आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लग्न समारंभे व सार्वजनिक कार्यक्रमावरील बंदी तसेच अंशतः लॉकडाऊन जाहीर झाल्याने याचा साखर विक्रीवर विपरीत परिणाम होणार आहे. यामुळे एप्रिलच्या कोट्याच्या साखर विक्रीसाठी मुदतवाढ मिळावी व पुढील महिन्याचा मर्यादित साखर कोटा जाहीर करावा, अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे.-जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ