शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दूधसागरजवळ एक्स्प्रेसवर दगडफेक

By admin | Updated: July 14, 2015 01:00 IST

गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये वातानुकूलित बोगीत घुसू न दिल्याच्या कारणावरून दूधसागर धबधबा येथे एका जमावाने दगडफेक करून बोगीच्या काचा फोडल्या.

मिरज : गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये वातानुकूलित बोगीत घुसू न दिल्याच्या कारणावरून दूधसागर धबधबा येथे एका जमावाने दगडफेक करून बोगीच्या काचा फोडल्या. त्यामुळे त्या बोगीतील संतप्त प्रवाशांनी मिरजेत एक्स्प्रेस रोखून गोंधळ घातल्याने एक्स्प्रेसला एक तास विलंब झाला. धबधबा परिसरात पर्यटनासाठी आलेल्यांना बेळगावकडे परत जाण्यासाठी निजामुद्दीन एक्स्प्रेस ही एकच रेल्वेगाडी असल्याने हजारो पर्यटक रुळाच्या दोन्ही बाजूस थांबले होते. गोव्यातून मिरजेकडे येणारी निजामुद्दीन एक्स्प्रेस सायंकाळी कॅसलरॉक स्थानकाच्या अलीकडे दूधसागर धबधब्याजवळ थांबल्यानंतर रेल्वेत पर्यटकांचा हा लोंढा घुसला. त्यांना रोखण्यासाठी वातानुकूलित बोगीतील प्रवाशांनी दरवाजे बंद केले. दरवाजे उघडण्यासाठी जमावाने आरडाओरडा करीत पुढील बाजूच्या एसी टु-टायर बोगीवर तुफान दगडफेक केली. यात एसी बोगीच्या आठ खिडक्यांच्या काचा फुटल्या. सुदैवाने दगडफेकीत कोणीही प्रवासी जखमी झाला नाही. एसी बोगीच्या काचा फुटल्याने वातानुकूलन यंत्रणा बंद पडली. दगडफेकीच्या घटनेमुळे व वातानुकूलन यंत्रणा बंद पडल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी मिरजेत गाडी आल्यानंतर गोंधळ घातला. एकदा गाडीचा रेक तयार झाल्यानंतर प्रवाशांची सुरक्षितता या कारणास्तव त्यात बदल करण्याचा किंवा बोगीच्या अदलाबदलीचा अधिकार स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांना नसल्याने मिरजेत रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. एसी बोगीच्या फुटलेल्या काचांना चिकटपट्ट्या लावून तात्पुरती मलमपट्टी करीत वातानुकूलन यंत्रणा सुरू केली. त्यानंतर तब्बल एक तासाच्या विलंबानंतरनिजामुद्दीन एक्स्प्रेस मिरजेतून रवाना करण्यात आली. (वार्ताहर)लोंढ्याजवळचे दूधसागर धबधबा हे केवळ रेल्वेने जाता येणारे पर्यटनस्थळ आहे. पावसाळ्यात तेथे जाण्यासाठी बेळगावसह परिसरातील जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने तरुण मिळेल त्या एक्स्प्रेसचा मार्ग धरतात. मात्र, सायंकाळी परत येण्यासाठी निजामुद्दीन एक्स्प्रेस ही एकमेव रेल्वे असल्याने दररोज या रेल्वेगाडीत जमावाची घुसखोरी होते. त्यातूनच वारंवार रेल्वेवर दगडफेकीच्या घटना होतात. गर्दीत चेंगराचेंगरी होऊन रेल्वेखाली सापडून अनेकांचा मृत्यूही झाला आहे.