शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

साखर निर्यातीकडे पाठ !

By admin | Updated: February 27, 2016 02:10 IST

साखर निर्यात न करणाऱ्या कारखान्यांवर खरेदी कर रद्द करण्याची कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असला तरी राज्यातील बड्या कारखानदारांनी साखर

- विश्वास पाटील,  कोल्हापूरसाखर निर्यात न करणाऱ्या कारखान्यांवर खरेदी कर रद्द करण्याची कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला असला तरी राज्यातील बड्या कारखानदारांनी साखर निर्यातीकडे पाठ फिरविल्याचे ‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी स्वत: पुढाकार घेत कारखानदारांना साखर निर्यातीची सूचना केली. मात्र साखर निर्यात न करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महत्त्वाच्या नेत्यांच्या ताब्यातील कारखान्यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आदी नेत्यांच्या ताब्यातील कारखान्यांनी निर्यातीकडे पाठ फिरविली आहे. साखर उद्योगाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निर्यातीसाठी थेट पंतप्रधानांकडे आग्रह धरला होता व त्यानंतर केंद्र शासनाने निर्यातीचे धोरण जाहीर केले होते. आता त्यानुसार निर्यातीची वेळ आल्यावर मात्र पुढच्या हंगामात साखरेला चांगला दर मिळेल म्हणून बड्या नेत्यांचे खासगी कारखाने निर्यातच करायला तयार नाही. त्यामुळे सहकारी कारखानदारांनीही त्याचीच री ओढली आहे. ‘लोकमत’ने बुधवारपर्यंत निर्यात न केलेल्या कारखान्यांची माहिती अधिकृत सुत्रांकडून मिळविली. साखर निर्यात न केलेल्या नेत्यांचे कारखाने- माजी मंत्री अजित पवार (अंबालिका, अहमदनगर)-माजी मंत्री जयंत पाटील (राजारामबापूसह अन्य तीन युनिट, साखराळे)-विजयसिंह मोहिते-पाटील (सहकारमहर्षीसह अन्य तीन युनिट, सोलापूर)-खा. धनंजय महाडिक (भीमा, टाकळी, सोलापूर)-बबनराव शिंदे (विठ्ठल कॉर्पोरेशन, सोलापूर)-माजी मंत्री छगन भुजबळ (गिरणा आर्मस्ट्राँग, नाशिक)-माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (भाऊराव पाटीलसह तीन युनिट, नांदेड)-आ. अमित व दिलीप देशमुख (मांजरा व रेणासह चार युनिट, लातूर)-माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील (इंदापूरसह तीन युनिट, पुणे)-माजी मंत्री पतंगराव कदम (सोनहिरा)-कल्याणराव काळे (चंद्रभागा, सोलापूर)-आ. सुभाष देशमुख (लोकमंगल अ‍ॅग्रो सोलापूर)-शंभूराजे देसाई (लोकनेते बाळासाहेब देसाई, पाटण)मराठवाड्यातील स्थिती : मराठवाड्यातील नांदेड, औरंगाबाद विभागात सुमारे पन्नास कारखाने आहेत. परंतु कमी उत्पादनाचे कारण देत १० कारखान्यांनी निर्यात केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील सोळापैकी एकट्या बी. बी. ठोंबरे यांच्या ‘नॅचरल शुगर्स’ व लातूरमध्ये १२ पैकी एकमेव सिद्धी शुगर कारखान्यानेच निर्यात केली आहे. औरंगाबादमधील एकाच खासगी कारखान्याने निर्यात केली आहे.दृष्टिक्षेपात निर्यात कोटा(लाख टन)देशाचा या वर्षीचा कोटा : ४० अपेक्षित निर्यात (८० टक्के) : ३२ महाराष्ट्राचा कोटा : १२ राज्यातून झालेली निर्यात : ३ देशातून झालेली निर्यात : ९ विभागनिहाय कोटा व निर्यात(लाख क्विंटल)पुणे ५२.८८ : ११.७०कोल्हापूर ४५ : १०.६०अहमदनगर१९.५०:२.१८नांदेड ६.८९ : ००.३३औरंगाबाद ९.२ : १.७२अमरावती ००.६५: ००नागपूर००.८९ :००एकूण१३९.६०:२५.६३