शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तळवडेतील कंपनीत टाकीचा स्फोट, सुदैवाने जिवीत हानी टळली

By admin | Updated: September 7, 2016 15:04 IST

तळवडे ज्योतिबानगर येथील त्रिमुर्ती इंजिनिअरिंग एंटरप्रायजेस या कंपनीत लोखंडी टाकी साफ करण्यासाठी लावलेल्या आगीमुळे टाकीचा स्फोट झाला.

ऑनलाइन लोकमत
तळवडे (कोल्हापूर), दि. ७ -  तळवडे ज्योतिबानगर येथील त्रिमुर्ती इंजिनिअरिंग एंटरप्रायजेस या कंपनीत लोखंडी टाकी साफ करण्यासाठी लावलेल्या आगीमुळे टाकीचा स्फोट झाला. मोठा आवाज झाल्याने कंपनीतील कामगार तसेच तळवडे एमआयडीसी परिसरातील कामगारांची धावपळ उडाली. ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली.अग्निशामक दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाऊण तासाच्या अथक परिश्रमाने आग विझवली. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही.
 
 कंपनीत मोठ्या आकारातील लोखंडी टाकी साफसफाईकरिता आणली होती. लोखंडी टाकीत डांबर असल्याने ते काढण्यासाठी कामगारांनी वेगवेगळे प्रयोग केले. टाकी साफ  करण्यासाठी लोखंडी टाकीच्या सर्व बाजुंनी आग लावण्याची शक्कल त्यांनी लढवली. लोखंडी टाकीतील डांबराने पेट घेतल्याने आगीच्या ज्वाळा, धुराचे लोळ पसरले. औद्योगिक परिसरात सर्वत्र धूर पसरला. कंपनीच्या आवारात तर एकाचवेळी धूर,आगीच्या ज्वाळा आणि जळालेल्या डांबराचा वास पसरला. लोकवस्तीच्या परिसरात असलेल्या या कंपनीमुळे परिसरातील रहिवाशीसुद्धा भयभीत झाले. तळवडेतील कंपनीत आग नियंत्रणाची कोणतीच यंत्रणा सज्ज नसल्याचे दिसून आले. अग्निशामक दलाचे बंब वेळीच पोहोचले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती.
 
तळवडे औद्येगिक परिसरात काही रासायनिक कारखानेही आहेत. तसेच पेट्रोलपंप, मोठ्या कंपन्यांच्या अत्यंत ज्वालाग्राही अशा हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडच्या मोठ्या टाक्याही आहेत.  त्यामुळे अशा घटना मोठ्या दुर्घटनांसाठी कारणीभूत ठरू नयेत. यासाठी दक्षतेच्या योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. औद्योगिक सुरक्षा विभागाच्या अधिकाºयांनी अशा कंपन्यांची गांभीर्याने दखल घ्यावी. अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.आठ वर्षापुर्वी भोसरीतील साई इंडस्ट्रिजमध्ये झालेल्या स्फोटात दहा महिला कर्मचारी होरपाळल्या होत्या. या दुर्घटनेनंतरही औद्योगिक क्षेत्रात याबाबत दक्षता घेतली जात नसल्याचा प्रत्यय आला.