शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

एसीबीने प्रधान सचिवांकडे मागितले स्पष्टीकरण

By admin | Updated: June 26, 2015 03:27 IST

महिला व बालविकास विभागातील २०६ कोटींच्या खरेदी प्रकरणी आपले म्हणणे काय आहे, अशी विचारणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित खात्याचे

मुंबई : महिला व बालविकास विभागातील २०६ कोटींच्या खरेदी प्रकरणी आपले म्हणणे काय आहे, अशी विचारणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित खात्याचे प्रधान सचिव संजयकुमार यांच्याकडे केली आहे, अशी माहिती एसीबीचे प्रमुख प्रवीण दीक्षित यांनी दिली. या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांच्याविरोधात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केलेली आहे. महिला व बालविकासमधील २०६ कोटींची ही खरेदी चांगलीच वादात सापडली असून त्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. काँग्रेसने केलेल्या तक्रारीवर एसीबीने प्रधान सचिवांकडे स्पष्टीकरण मागितले असले, तरी एसीबीच्या या कृतीलाच काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. ज्या सचिवांनी ही नियमबाह्य खरेदी थांबवणे अपेक्षित होते, त्यांनीच त्यास संमती दिलेली असताना त्यांच्याकडूनच स्पष्टीकरण मागणे तर्कसंगत नाही, असे सावंत यांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादी  काँग्रेसने नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात एसीबीची कारवाई सुरू असतानाच मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर आरोप झाला. या आकस्मिक योगावर रिपाइंचे नेते खा. रामदास आठवले यांनी वेगळाच तर्क लढविला आहे. भुजबळ आणि मुंडे हे दोन्ही नेते मागासवर्गीय असल्यामुळे जाणिवपूर्वक त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप आठवले यांनी केला आहे. राष्टÑवादी युवक कॉंग्रेसदेखील मुंडे यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन छेडणार आहे. संकेतस्थळावर जीआर नाही! शासनाचा कारभार पारदर्शक ठेवण्यासाठी सर्व शासन निर्णय संकेत स्थळावर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. परंतु महिला बाल विकास मंत्रालयासह इतर अनेक मंत्रालये त्याचे पालन करत नाहीत. २०६ कोटीच्या खरेदीचा एकही जीआर शासनाच्या वेबसाईटवर अद्यापही टाकण्यात आलेला नाही, अशी तक्रार माहिती अधिकाराचे कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या विभागाने केलेल्या खरेदीला भ्रष्टाचार म्हणणे चूक आहे असे निवेदन या विभागाने प्रसिध्दीस दिले आहे. राज्य सरकारच्या उद्योग विभागाने केलेल्या दर करारानुसारच चिक्कीची खरेदी करण्यात आली आहे. दरकरार असले तरी १ कोटीच्या वरती ई टेंडर करण्याचे आदेश १७ एप्रिल रोजी काढले आहेत. ही खरेदी त्याआधी केलेली आहे असेही विभागाने निवेदनात म्हटले आहे. मात्र मेडीसीन कीटच्या खरेदीबाबत कोणताही खुलासा या निवेदनात करण्यात आलेला नाही. खरेदी करण्यात आलेल्या चिक्कीच्या गुणवत्तेची चौकशी करण्यात येईल. संपूर्ण प्रकरणाची मात्र चौकशी केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)