शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचे पहिले चंद्रग्रहण अनुभवा शुक्रवारी...; चंद्र जाणार पृथ्वीच्या उपछायेतून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 09:30 IST

गडद सावलीतून चंद्र गेल्यास खग्रास तर उप छायेतून गेल्यास छायाकल्प चंद्रग्रहण घडते, अशी माहिती स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

मुंबई : भारतातून ५ मे रोजी छायाकल्प चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतातून दिसणारे हे या वर्षीचे पहिले ग्रहण असेल. ग्रहणात चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून जात असल्याने चंद्र किंचित अंधूक होतो म्हणून त्याला ‘छायाकल्प चंद्रग्रहण’ म्हणतात. छायाकल्प चंद्रग्रहण आशिया, आस्ट्रेलिया, युरोप, पूर्व आफ्रिका, पॅसिफिक, इंडियन आणि अटलांटिक महासागरातून दिसेल. ५ मे रोजी ग्रहणाला भारतीय वेळेनुसार रात्री ८:४४ वाजता सुरुवात होईल. ग्रहणमध्य १०:५२ तर ग्रहण समाप्ती मध्यरात्री १:१ वाजता होईल.

२० एप्रिल रोजी हायब्रीड सूर्यग्रहण झाले होते. परंतु ते भारतातून दिसले नाही. ५ मे रोजी होणारे हे छायाकल्प चंद्रग्रहण खगोलीय दृष्टीने महत्त्वाचे आहे. छायाकल्प ग्रहण म्हणजे खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण होताना चंद्र पृथ्वीच्या गडद छायेतून जातो. त्यामुळे चंद्र काळा, लाल दिसतो. परंतु छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र काळा, लाल दिसत नाही. तो नियमित पौणिमेच्या चंद्रासारखाच; परंतु बारकाईने निरीक्षण केल्यास थोडा काळपट झालेला दिसतो. जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका रेषेत येतात तेव्हाच चंद्र-सूर्य ग्रहणे होतात. 

चंद्र ग्रहणावेळी सूर्य आणि चंद्रामध्ये पृथ्वी येते आणि म्हणून पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. पृथ्वीच्या दोन प्रकारच्या सावल्या असतात. गडद सावली आणि उपछाया. गडद सावलीतून चंद्र गेल्यास खग्रास तर उप छायेतून गेल्यास छायाकल्प चंद्रग्रहण घडते, अशी माहिती स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

कसे असते ग्रहण?

छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र पूर्ण दिसतो. परंतु त्याचे तेज ग्रहण काळात ४ ते ५ टक्क्यांनी कमी होते किंवा गडद छायेकडील चंद्र बिंबाचा थोडा भाग किंचित काळपट दिसतो. बारकाईने पाहिल्यास हा फरक जाणवतो. अन्यथा नियमित निरीक्षण न करणाऱ्या व्यक्तींना चंद्रग्रहण लागले हे कळत नाही. आकाश ढगाळ नसेल तर साध्या डोळ्याने घरूनच ग्रहण बघावे.