शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

५० हजार कोटींवर खर्च, तरी दलित वस्त्या गचाळ; सुधारणांपासून वंचितच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 07:26 IST

दलित वस्त्यांमध्ये मुख्यत्वे पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती आणि रस्ते ही कामे करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामूहिक विकास योजना राबविली जाते.

मुंबई : राज्यातील दलित वस्त्यांमध्ये गेल्या २५ वर्षांत विविध सुविधांसाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने ५० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम खर्च केली असली तरी सुधारणांची बोंब दिसत असून लोकप्रतिनिधी, कंत्राटदार यांच्या संगनमतातून या योजनेचा वेळोवेळी बट्ट्याबोळ झाल्याचे समोर आले. या प्रकारांना आळा घालण्यासाठी तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने दलित वस्त्यांचे जीआयएस मॅपिंग करण्याचा घेतलेला निर्णय अजूनही कागदावरच आहे.

दलित वस्त्यांमध्ये मुख्यत्वे पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती आणि रस्ते ही कामे करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामूहिक विकास योजना राबविली जाते. या योजनेत सामाजिक न्याय विभागार्फत दरवर्षी साधारणात: १,२०० ते १,५०० कोटी रुपये खर्च केले जातात. या शिवाय विभागामार्फत विविध जिल्हा नियोजन समित्यांना ३ हजार कोटी रुपये दिले जातात. त्यातून डॉ. आंबेडकर सामूहिक विकास योजनेवर साधारणत: ५०० कोटी रुपये दरवर्षी खर्च केले जातात. 

२०१८ मध्ये निघाला होता जीआर एकच काम दोन वेळा दाखवून निधी लाटणे, या कामांमधील टक्केवारीत अनेकांचे झालेले चांगभले आणि दलित वस्त्या मात्र सुधारणांपासून वंचितच असे चित्र समोर आल्यानंतर फडणवीस सरकारने २०१८ मध्ये एक जीआर काढला आणि दलित वस्त्यांचे जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातून कोणत्या वस्त्यांमध्ये किती विकास कामे झालेली आहेत हे स्पष्ट होणार होते. केंद्राच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र रिमोट सेंसिंग ॲप्लिकेशन सेंटरला (एमआरसॅक) हे काम देण्याचा निर्णय झाला होता.

...आणि कामच पूर्ण झाले नाहीसर्वेक्षणाचे काम एका खासगी कंपनीला दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांना देण्याचा घाट घातला गेला. मात्र, विभागाच्या तत्कालीन सचिवांनी त्यास हरकत घेतल्यानंतर खासगी कंपनीला काम दिले गेले नाही आणि एमआरसॅकच्या माध्यमातूनही ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे दलित वस्त्यांमध्ये आतापर्यंत किती कामे झाली, या कामांची पुनरावृत्ती होत आहे का, कोणती कामे खरेच होणे बाकी आहे याची अचूक माहिती मिळू शकत नाही.