शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
3
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
4
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
5
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
6
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
7
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
8
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
9
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
10
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
11
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
12
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
13
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
14
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
15
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
16
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
17
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
18
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
19
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
20
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान

कार्यकारिणी बरखास्त

By admin | Updated: November 25, 2015 03:31 IST

महाराष्ट्राच्या राजकारणात शिरकाव करू पाहणाऱ्या आॅल इंडिया मजलिस -ए-इतेहद्दुल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षाने मुंबई व ठाणे वगळता राज्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त केल्या आहेत.

जमीर काझी, मुंबईमहाराष्ट्राच्या राजकारणात शिरकाव करू पाहणाऱ्या आॅल इंडिया मजलिस -ए-इतेहद्दुल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षाने मुंबई व ठाणे वगळता राज्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त केल्या आहेत. पक्षांतर्गत वाढती गटबाजी व मतभेदामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. असाऊद्दीन ओवेसींनी हा निर्णय घेतला आहे.गेल्या वर्षी वांद्रे विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. मात्र वांद्रे पोटनिवडणुकीत एमआयएमच्या उमेदवाराला डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की पत्करावी लागली. तेव्हापासून पक्षांतर्गत कुरबुरीच्या चर्चा चव्हाट्यावर आल्या होत्या. मात्र आगामी मुंबई व ठाण्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून येथील विद्यमान कार्यकारिणी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडीचे सरचिटणीस अक्रम खान यांची हकालपट्टी केल्यानंतर चिडलेल्या त्यांच्या समर्थकांनी गेल्या आठवड्यात भायखळ्यातील पक्षाचे आमदार अ‍ॅड. वारिस पठाण यांची भेट घेऊन पदाचे राजीनामे देण्याचे जाहीर केले होते. त्या वेळी कार्यकर्त्यांत वादही झाला होता. नवीन कार्यकारिणीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून सक्षम, सुशिक्षित, समाजाच्या प्रश्नांची जाण असलेल्या कार्यकर्त्यांना स्थान दिले जाईल, असे खा. ओवेसी यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी कोअर कमिटीचे सदस्य सर्व जिल्ह्णांचे दौरे करून पाहणी करतील. त्यानंतर एप्रिलमध्ये नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे.आगामी मुंबई व ठाण्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून येथील विद्यमान कार्यकारिणी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडीचे सरचिटणीस अक्रम खान यांची हकालपट्टी केल्यानंतर चिडलेल्या त्यांच्या समर्थकांनी गेल्या आठवड्यात भायखळ्यातील पक्षाचे आमदार अ‍ॅड. वारिस पठाण यांची भेट घेऊन पदाचे राजीनामे देण्याचे जाहीर केले होते. कोअर कमिटीतील सदस्यसय्यद मोईन (नांदेड), अंजुम इनामदार (पुणे), मौलाना मेहफजुर, रहेमान, डॉ. गफार कादरी, पंडीत बोरडे (सर्व औरंगाबाद), मोहम्मद अली (लातूर), मोहम्मद सलीम (नागपूर), इब्राहिम अली अबू (नांदेड) व अ‍ॅड. विलास डोंगरे (नागपूर) महाराष्ट्रात पक्षाची ताकद वाढत आहे. नवीन व होतकरू, अभ्यासू कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. प्रत्येक पक्षात मतमतांतरे असतात, त्याचा अर्थ मोठे मतभेद, दुफळी निर्माण झाल्याचे समजणे चुकीचे आहे. पक्षाच्या पुनर्स्थापनेसाठी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून नवीन निवडीची प्रक्रिया लवकर सुरू केली जाईल.-आ.अहमद बाला, महाराष्ट्र प्रभारी, एमआयएम