शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

माजी सैनिकांना मिळाली नोकरी

By admin | Updated: August 9, 2015 02:16 IST

भारतीय लष्करात नर्सिंग असिस्टंट म्हणून नोकरी करून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांकडे नर्सिंगची औपचारिक पदवी किंवा पदविका नसली तरी ते लष्करी अनुभवाच्या जोरावर राज्य सरकारच्या

मुंबई : भारतीय लष्करात नर्सिंग असिस्टंट म्हणून नोकरी करून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांकडे नर्सिंगची औपचारिक पदवी किंवा पदविका नसली तरी ते लष्करी अनुभवाच्या जोरावर राज्य सरकारच्या सेवेत स्टाफ नर्स (पुरुष) या पदावरील नोकरीसाठी पात्र ठरतात, असा निकाल देऊन महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) तीन माजी सैनिकांना नोकरी देण्याचा आदेश दिला आहे.उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे यांनी आॅगस्ट २०१३ मध्ये स्टाफ नर्स (पुरुष) या पदांसाठी जाहिरात दिली होती. त्यानुसार अर्ज केलेल्यांची एमकेसीएलतर्फे लेखी परीक्षा घेण्यात आली. सुरेश सोपान नागरगोजे (येवलवाडी, ता. पाटोडा, जि. बीड), नाना श्रीरंग जाधव (संगमनगर, खेड रोड, सातारा) आणि रवींद्र गणपत साळुंके (पवारवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) या तीन माजी सैनिकांना या परीक्षेत गुणवत्तेनुसार निवड झाल्याचे गेल्या वर्षी जानेवारीत कळविण्यात आले. त्यानंतर या सर्वांनी अ‍ॅड. भूषण बांदिवडेकर यांच्यामार्फत ‘मॅट’कडे दाद मागितली.‘मॅट’चे सदस्य एम. रमेश कुमार व जे. डी. कुलकर्णी यांच्यापुढे सुनावणी झाली तेव्हा या तिघांकडे आवश्यक शैक्षणिक अर्हता नसल्याचा मुद्दा निघाला. आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. हणमंतराव चव्हाण यांनी प्रतिज्ञापत्र केले व त्याआधारे सरकारी वकील ए.एस. वाबळे यांनी सांगितले की, आरोग्य सेवा संचालनालयाकडे सल्ला मागितला आहे. तसेच ज्यांची नर्स म्हणून रीतसर नोंदणी झालेली नाही अशांना नर्स म्हणून नोकरी देता येते का, यावर नर्सिंग कौन्सिलकडूनही माहिती ंमिळालेली नाही. मात्र अ‍ॅड. बांदिवडेकर यांनी असे निदर्शनास आणले की, गेतवर्षी ‘मॅट’ने अशाच एका प्रकरणात राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने २३ सप्टेंबर १९९३ रोजी जारी केलेल्या ‘जीआर’नुसार लष्करात नर्सिंग असिस्टंट (एमसी) (एडीसी) हे पद नागरी सेवेतील नर्स पदाशी समकक्ष ठरविण्यात आले होते.पूर्वलक्षी प्रभावाने नियुक्तीखरे तर आपल्याला ही नोकरी गेल्या डिसेंबरपासूनच मिळायला हवी होती. परंतु पात्र असूनही ती अन्यायाने नाकारली गेली. त्यामुळे आता पूर्वलक्षी प्रभावाने नियुक्ती दिली जावी, अशी विनंतीही अर्जदारांनी केली. मात्र तसा आदेश न देता अर्जदारांनी त्यासाठी नोकरीत लागल्यावर अर्ज करावा व त्यावर सरकारने निर्णय घ्यावा, असे ‘मॅट’ने सांगितले.