शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

जगदंबा तलवारीचा मिळाला पुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 20:10 IST

Shivaji Maharaj Kolhapur- छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली जगदंबा ही तलवार इंग्लंड येथील राणीच्या वैयक्तिक संग्रहालयात रॉयल कलेक्शन ट्रस्ट येथे ठेवण्यात आली आहे. याचे ठोस पुरावे तेथील सी. प्युरडॉन क्लार्क यांनी तयार केलेल्या कॅटलॉगमुळे मिळाले असल्याची माहिती सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राचे सचिव अमित आडसुळे आणि शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाचे अध्यक्ष हर्षल सुर्वे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देजगदंबा तलवारीचा मिळाला पुरावा इंग्लंडमधील कॅटलॉगमध्ये छायाचित्रासह वर्णन

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली जगदंबा ही तलवार इंग्लंड येथील राणीच्या वैयक्तिक संग्रहालयात रॉयल कलेक्शन ट्रस्ट येथे ठेवण्यात आली आहे. याचे ठोस पुरावे तेथील सी. प्युरडॉन क्लार्क यांनी तयार केलेल्या कॅटलॉगमुळे मिळाले असल्याची माहिती सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राचे सचिव अमित आडसुळे आणि शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाचे अध्यक्ष हर्षल सुर्वे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.आडसुळे म्हणाले, कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांनी सन १८७५ मध्ये भारतभेटीवर आलेल्या तत्कालीन ग्रेट ब्रिटनचा युवराज प्रिन्स ऑफ वेल्स याला एक तलवार आणि एक कट्यार भेट दिली होती. ही तलवार शिवाजी महाराजांच्या वापरातील जगदंबा तलवार होती हे संशोधक इंदरजित सावंत यांनी आपल्या पुस्तकातून आधीच सिद्ध केले आहे. मात्र इंग्लंडला गेल्यानंतर या तलवारीबाबत चुकीची माहिती दिली जाते. मात्र इंग्लंडमधील साडून केनस्टिंग गॉन म्युझियमचे संचालक सी. प्युरडॉन क्लार्क यांनी तयार केलेल्या कलेक्शन ऑफ इंडियन आर्म्स ॲण्ड ऑबजेक्टस् ऑफ आर्ट या कॅटलॉमुळे एक नवा पुरावाच पुढे आला आहे. यामध्ये या तलवारीचे छायाचित्र आणि माहिती देण्यात आली आहे.हर्षल सुर्वे म्हणाले, या कॅटलॉगमुळे शिवरायांची तलवार आमच्याकडे नाही असे वारंवार लिहून देणाऱ्या रॉयल कलेक्शन ट्रस्टच्या अधिकाऱ्यांचा खोटेपणा उघड झाला आहे. त्यामुळे आता ही तलवार परत आणावी यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना मेल केले आहेत. पत्रे पाठवली आहेत. उद्या सकाळी याच मागणीसाठी तावडे हॉटेलजवळ रास्ता रोको करण्यात येणार आहे. खासदार संभाजीराजे यांनाही याबाबत निवेदन दिले आहे. या पत्रकार परिषदेला प्रदीप हांडे, चैतन्य आष्टेकर, रविराज कदम, अमृता सावेकर, आदित्य पवार, युवराज हळदीकर, देवराज सावंत उपस्थित होते.कॅटलॉगमधील तलवारीचे वर्णनजुनी युरोपिअन एकपाती, सरळ तलवार, ज्याच्या दोन्ही बाजूला दोन खोबणी असून, एकामध्ये आयएचएस असे तीन वेळा कोरले आहे. तलवारीच्या मुठीजवळील गजावरती सोन्यामध्ये फुलांची नक्षी कोरली आहे. तलवारीची मूठ लोखंडी असून, त्याला गोलाकार परज असून, शेवटचे टोक अणकुचीदार आहे आणि त्यावर भरीव सोन्याने कोरलेली फुलांची नक्षी असून, त्यामध्ये मोठे हिरे व माणिक जडवलेले आहेत. ही तलवार कोल्हापूरच्या मा. छत्रपतींच्याकडून दिली गेली असून, ती मराठ्यांचे प्रमुख शिवाजी यांची निशाणी आहे. सदर तलवार ही त्यांच्या वापरातील होती.इंग्लंड कसोटीवेळी गनिमी कावाइंग्लंडविरोधात पुण्यात जी कसोटी होणार आहे तेव्हा गनिमी काव्याने सामन्याला विरोध केला जाणार आहे. ही तलवार परत द्या, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkolhapurकोल्हापूर