शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

मुंबईतून दर आठ तासाला होतेय वाहनचोरी...

By admin | Updated: May 11, 2017 02:27 IST

दर आठ तासाला मुंबईतून एक वाहन चोरीला जात असल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दर आठ तासाला मुंबईतून एक वाहन चोरीला जात असल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांच्या आकडेवारीवरून समोर येत आहे. गेल्या चार महिन्यांत मुंबईतून तब्बल ८८७ वाहने चोरीला गेली असून, त्यापैकी अवघ्या २१० वाहनांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहेत. त्यामुळे या गुन्ह्यांची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.देशाची आर्थिक राजधानीतील चोर-पोलिसांचा खेळ पोलिसांसाठीच डोकेदुखी ठरत आहे. सोन्याच्या वाढत्या किमतीसोबतच धूमस्टाईलने सोनसाखळीच्या चोऱ्या करण्याचे प्रमाण काही वर्षापूर्वी मुंबईत प्रचंड वाढले होते. निव्वळ सोनसाखळी चोरीच्या दिवसाला सरासरी पाच ते सहा, तर वर्षाकाठी सुमारे दीड हजार गुन्ह्यांची नोंद होत होती. मात्र, तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी रस्त्यावरील ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विशेष उपाययोजना आखल्या. त्यानंतर, सोनसाखळीसारखे गुन्हे करणाऱ्यांना जरब बसली. सोनसाखळी चोरांना पोलिसांनी वेसण घातली असली, तरी मोटारवाहन चोरी, जबरी चोऱ्या, दिवसा-रात्रीच्या घरफोड्या अशा गुन्ह्यांना आळा घालण्यात पोलिसांना यश आलेले नाही. गेल्या वर्षभरात मोटारवाहन चोरीचे ३ हजार ११८ गुन्हे दाखल झाले आहेत. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे, वाहनचोरीच्या गुन्ह्यांच्या उकलींचे प्रमाण अवघे २५ ते २८ टक्के आहे. त्यात या वर्षी १ जानेवारी ते २३ एप्रिल २०१७ पर्यंत वाहनचोरीचे तब्बल ८८७ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे मुंबईत दर आठ तासाला वाहनचोरी होत असल्याचे विदारक वास्तव यातून समोर येत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या वाहनांची काळजी घेणे गरजेचे आहे. वाहनचोरीच्या नानाविध प्रयत्नांमुळे चालकांप्रमाणे पोलिसांची डोकेदुखी वाढते आहे. त्यामुळे या चोरांना आवर घालण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत.