सणबूर (जि. सातारा) : पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या युवतीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. वाल्मिक पठारावरील असवलेवाडी (ता. पाटण) येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. कमल उत्तम असवले (२१) असे मृत युवतीचे नाव आहे. असवलेवाडी या दुर्लक्षित गावात सध्या पाण्याची तीव्र टंचाई असून, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठीही गावाबाहेरच्या विहिरीवर जावे लागत आहे. बुधवारी सायंकाळी कमल आणि अन्य काही मुली या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या.सुरुवातीला कमल विहिरीत उतरली. तिने कळशी भरून घेतली. मात्र, त्याच वेळी तोल गेल्याने ती पाण्यात पडली. त्यामुळे काठावर थांबलेल्या मुली आरडाओरडा करीत गावाकडे धावल्या. ग्रामस्थही तातडीने त्या ठिकाणी धावले. मात्र, तोपर्यंत कमल बुडाली होती. ग्रामस्थांनी गळ टाकून विहिरीत शोध घेतला असता, कमलचा मृतदेह आढळून आला. (वार्ताहर)
हंडाभर पाण्यासाठी गमावला जीव!
By admin | Updated: April 1, 2016 01:31 IST