शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

अखेर गाणारांनी बाजी मारली

By admin | Updated: February 8, 2017 05:46 IST

नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत अखेर भाजप समर्थित महाराष्ट्र राज्य परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांनी बाजी मारली

नागपूर : नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत अखेर भाजप समर्थित महाराष्ट्र राज्य परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांनी बाजी मारली. गाणार यांनी दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीनंतर १२०३९ मते मिळवित शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांना मागे टाकले. झाडे यांना ७१९९ मते मिळाली. गाणार पहिल्या फेरीत विजयाच्या उंबरठ्यावर पोहचले खरे, पण अधिकृत विजयासाठी गाणार समर्थकांच्या हृदयाचा ठोका वाढला. रात्री १.४५ वाजता आलेल्या दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीत गाणार यांना १२०३९ मतेच पडली होती. त्यांना विजयासाठी १३ हजार ८६० मतांची आवश्यकता आहे. विजयासाठी कोटो पूर्ण झाला नसला तरी सर्वाधिक मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषीत करण्यात आले. पहिल्या तीन फेरीत पहिल्या पसंतीत त्यांनी १००३२ मते मिळविली होती. परंतु दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये त्यांनी चांगलीच माघार घेतली. १३ उमेदवार बाद झाल्यानंतर त्यांना ११३३० मतेच पडली. विशेष म्हणजे गाणार यांना विजयी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. पहिल्या पसंतीच्या मतांवरच गाणार विजयी होतील, असा दावा केला होता. परंतु गाणार यांना विजयासाठी उशीरापर्यंत प्रतिक्षा करावी लागली. मंगळवारी सकाळी ८ वाजतापासून विभागीय शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीस सुरुवात झाली. २९१७६ मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण तीन फेऱ्यांमध्ये पहिल्या पसंतीच्या मतांसाठी मतमोजणी घेण्यात आली. पहिल्या फेरीत गाणार यांना ४९६०, दुसऱ्या फेरीत ४६३२ व तिसऱ्या फेरीत ४४० मते पडली.