शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आजही सुरक्षा रक्षकाशिवाय मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरू शकतो : देवेंद्र फडणवीस 

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: January 11, 2021 20:17 IST

राज्य सरकारच्या सुरक्षा काढणे वा ठेवणे या निर्णयाचा आमच्यावर काहीही परिणाम होत नाही. आम्हाला त्याची काही चिंता नाही.

लोणावळा: राज्यातील ठाकरे सरकारने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, रामदास आठवले, मनसेप्रमुख राज ठाकरे, भाजप नेते चंद्रकांत पाटील, नारायण राणे यांच्यासह पंधरा राजकीय नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजपसह मनसेने राज्य सरकारच्या या निर्णयावर चांगलेच धारेवर धरले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

लोणावळा येथे आयोजित भाजप महिला आघाडी मेळाव्याला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, राज्य सरकारच्या सुरक्षा काढणे वा ठेवणे या निर्णयाचा आमच्यावर काहीही परिणाम होत नाही. आम्हाला त्याची काही चिंता नाही. आम्ही सुरक्षेविना फिरणारे लोक आहोत. आम्हाला जी काही सुरक्षा दिली गेली आहे ती पुरेशी आहे. तसेच ती सुद्धा काढली तरी मला काहीही फरक पडणार नाही. मी प्रदेशाध्यक्ष असताना देखील एकही सुरक्षारक्षक माझ्याबरोबर नव्हता. मी गडचिरोलीला जायचो, सिरोंचाला जायचो. सगळीकडे फिरायचो. आजही सुरक्षा रक्षकाशिवाय मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरू शकतो. त्यामुळे माझी काही तक्रार नाही वा आक्षेप देखील नाही.

युवा सेनेच्या वरुण देसाई यांना दिलेल्या 'एक्स' दर्जाच्या सुरक्षेवरून उपरोधिक टीकाराज्य सरकारने युवा सेनेचे सचिव असलेल्या वरुण देसाई यांना थेट 'एक्स' दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यावरून 'वरुण द्या, खालून द्या, ह्याला द्या, त्याला द्या. तुमच्या मनात असेल त्यांना सुरक्षा द्या,' असा उपरोधिकटीका फडणवीस यांनी ठाकरे सरकार केली आहे. तसेच आमची सुरक्षा काढून ती राज्यातील महिलांना द्यावी, हे चंद्रकांत पाटलांचे मत देखील योग्य असून तेच मला देखील वाटते. पण ठाकरे सरकारने या सगळ्या गोष्टींवर लक्ष देण्याऐवजी भंडाऱ्यासारख्या घटनेवर ठाकरे सरकारने अधिक लक्ष द्यावे,' अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे सरकारला सुनावले आहे. 

गुजराती समाजाच्या मेळाव्यावरून शिवसेनेला टोला  मुंबई महापालिकेच्या निवडणुकांना समोर ठेवून का होईना शिवसेना 'गुजराती समाजाला आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न करत आहे. ही आनंदाची बाब आहे. ते पण आपलेच नागरिक आहेत. मात्र, फक्त निवडणुकांच्या तोंडावर गुजराती समाजाशी सौहार्द न ठेवता त्या व्यतिरिक्त देखील त्यांच्याशी गुजराती समाजाशी सौहार्द संबंध ठेवले पाहिजे अशा शब्दात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टोला लगावला आहे. 

टॅग्स :PuneपुणेlonavalaलोणावळाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकार