शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आमच्यासाठी आजही नारायण राणे हेच देव - आमदार  नितेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:22 IST

प्रदेशस्तरावरून बैठकीसाठी नेतेमंडळी सिंधुदुर्गमध्ये येत आहेत याची माहिती येथील नेतृत्वाला नसावी, यासारखे दुर्दैव काही नाही. आमचे आजही नारायण राणे हेच देव आहेत. त्यामुळे आम्ही काँग्रेसमध्ये असतानाही प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आमच्यात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. हे आम्ही खपवून घेणार नाही, असा सज्जड दम आमदार नीतेश राणे यांनी

 - अनंत जाधवसावंतवाडी, दि. 8 - प्रदेशस्तरावरून बैठकीसाठी नेतेमंडळी सिंधुदुर्गमध्ये येत आहेत याची माहिती येथील नेतृत्वाला नसावी, यासारखे दुर्दैव काही नाही. आमचे आजही नारायण राणे हेच देव आहेत. त्यामुळे आम्ही काँग्रेसमध्ये असतानाही प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आमच्यात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. हे आम्ही खपवून घेणार नाही, असा सज्जड दम आमदार नीतेश राणे यांनी प्रदेशस्तरावरून आलेल्या काँग्रेस नेत्यांना भरला. तसेच प्रदेश काँग्रेसची बैठक स्थानिक जिल्ह्यातील नेत्यांनीच ‘हायजॅक’ केल्याचे चित्र निर्माण झाले होते. आमदार नीतेश राणे यांनी केलेल्या आरोपावर प्रदेश काँग्रेसचे नेते खासदार हुसेन दलवाई यांनी तत्काळ प्रत्युत्तर दिले. आम्हाला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी फूट पाडण्यासाठी पाठविले नसून, येथील काँग्रेस एकसंघ बघून आम्हाला आनंद झाला आहे. त्यामुळे या बैठकीचा वेगळा अर्थ कोणी काढू नये, असा खुलासाही दलवाई यांनी यावेळी केला.सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात एक बैठक काँग्रेस नेते नारायण राणे यांनी ओसरगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी, तर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सिंधुदुर्गमध्ये एक नेत्यांचे शिष्टमंडळ पाठविले होते. त्यांनीही सावंतवाडीतील आरपीडी महाविद्यालयात दुपारी ३.३० वाजता बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, या बैठकीचे निमंत्रण जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाºयांना नव्हते.तरीही आरपीडी कॉलेजच्या सभागृहात प्रदेश बैठकीत आमदार नीतेश राणे यांच्यासह जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, संजू परब, महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई आदींसह मोठ्या संख्येने काँग्रेसचे जिल्ह्यातील पदाधिकारी एकाच ठिकाणी दाखल झाल्याने पोलिसांनीही बैठक स्थळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस, पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस सभास्थळी होते.बैठकीला सुरूवात होताच काँग्रेस नेते नारायण राणे यांना कोणतीही कल्पना न देता जेष्ठ नेते विकास सावंत यांनी बैठक आयोजित केली असल्याचा आरोप राणे समर्थकांकडून करण्यात आला. बैठक सुरू होताच आमदार नीतेश राणे व त्यांचे समर्थक बैठक स्थळी पोहोचले. त्यांनी काँग्रेसचे नेते नारायण राणे यांना विश्वासात न घेता कोणी बैठक आयोजित केली, असा प्रश्न केला. याचा प्रथम खुलासा करा, अशी मागणी आमदार नीतेश राणे यांनी केली. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या विकास सावंत यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या सूचनेनुसार ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. प्रांतिक सदस्य म्हणून आपण या बैठकीस उपस्थित राहिलो आहे. बैठकीपूर्वी वरिष्ठ नेत्यांकडून जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र तो झाला नाही. त्यामुळे गैरसमज झाले, असे सावंत यांनी सांगितले. त्यांना आमदार नीतेश राणे यांनी रोखत आम्ही तुमचे भाषण ऐकण्यासाठी आलो नाही, तुम्ही आमचे ऐका, असे सांगितले. यावेळी राजन भोसले यांनी माईक हातात घेत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी राणे यांनी रोखत त्यांना खडे बोल सुनावले. आम्ही अजूनही गांधी घराण्याच्या विचाराने काँग्रेसमध्ये काम करतो. काँग्रेसला राज्यात कुठे मिळाले नाही असे यश नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला जिल्ह्यात मिळाले. अतिशय कठीण परिस्थितीत काम करताना कधी तुम्ही जिल्ह्यात आला नाहीत. मग आता कशासाठी आलात, असा प्रश्न त्यांनी केला. आम्ही काँग्रेसमध्ये असता आमचे नेते नारायण राणे यांच्याविरोधात प्रदेशअध्यक्ष अशोक चव्हाण घाणेरडे राजकारण करत असून, ते काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे काम करत असल्याचा आरोप आमदार राणे यांनी केला. पक्षाचे आदेश नारायण राणेंच्या माध्यमातून आले तरच त्या आदेशांची अंमलबजावणी केली जाईल. राणेंना भेटल्याशिवाय कोणत्याही नेत्यांना जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच इथे भाषण करण्यापेक्षा तुमच्या भागात भाषण केला असता, तर नगरसेवक झाला असता. मी वयाने लहान असून आमदार आहे, असा टोलाही त्यांनी भोसले यांना लगावला. यावेळी राणे समर्थकांनी ‘राणे साहेबांचा विजय असो, नीतेश राणेसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा दिल्या. जिल्ह्यात अतिशय कठिण परिस्थितीत नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने अनेक निवडणुका जिंकल्या; मात्र प्रदेश कमिटीकडून एकदाही आमचे अभिनंदन करण्यात आले नाही, अशी खंत दत्ता सामंत यांनी व्यक्त करत आपण स्वत: जिल्हाध्यक्ष असून सुद्धा सभासद आपणाला नोंदणीचे पुस्तक अद्याप मिळाले नसल्याचे दलवाई यांना सांगितले. वातावरण शांत झाल्यानंतर दलवाई यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, नारायण राणे आपले नेते आहेत. ते जिल्ह्यात आहे हे आपणाला माहीत असते तर त्यांची भेट घेऊनच दौºयाची सुरुवात केली असती. काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे काम कोणी करत नाही, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला. जिल्हा काँग्रेस एकसंघ आणि सक्षम आहे हे पाहून आपणाला आनंद झाला. काँग्रेस हा भाजपासारखा नसून येथे समर्थनाबरोबरच निषेध नोंदविण्यासाठी वाव आहे, असे खासदार दलवाई म्हणाले. भाजप प्रवेशासाठी ईडीच्या धमक्या : दलवाईदेशात सर्वच पक्षाच्या नेत्यांना भाजप प्रवेश करा अन्यथा तुमच्यामागे ईडीची चौकशी लावू, असे सांगून त्यांना हैराण केले जात आहे. या धमक्यांना काँग्रेस भीक घालत नाही.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Nitesh Raneनीतेश राणे