शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमध्ये उकाड्याने लाहीलाही

By admin | Updated: March 3, 2017 03:14 IST

यंदा त्याआधीच वाढलेल्या उष्म्याने जव्हारकरांना कधी न होणारी वणव्याची अनुभूती येत आहे.

हुसेन मेमन,जव्हार- होळी सणानंतर उष्म सुरू होतो, मात्र यंदा त्याआधीच वाढलेल्या उष्म्याने जव्हारकरांना कधी न होणारी वणव्याची अनुभूती येत आहे. गेल्या तीन दिवसांत पारा ३९ अशांवर पोहोचला आहे. किमान तापमानातही दिवसगणिक वाढ होत असल्याने आता उन्हाचे चटके आणि झळा यांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे जव्हारकरांच्या अंगाची लाही लाही झाली आहे. यामुळे शीतपेयांची तसेच बाटलीबंद थंड पाण्याची मागणी सतत वाढते आहे. त्यात भारनियमनाची भर पडल्याने पंख्याचा वारा घेणेही शहरवासियांना अवघड झाले आहे. तळमळत बसण्याशिवाय त्यांच्यापुढे कोणताही पर्याय उरलेला नाही.मिनी महाबळेश्वर अशी ख्याती असलेले जव्हार शहर गेल्या काही वर्षांपासून जंगल तोड होत असल्यामुळे आणि वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे प्रचंड तापते आहे. मागील काही दिवसांत अचानक पडणाऱ्या अवकाळी पावसाने नागरीकांची चांगलीच झोप उडवली होती, त्यानंतर अचानक उन्हाच्या तडाख्याचा जोर इतका वाढला की, जमिनीतील वाफ आणि वरून सूर्यप्रकाशाचा मारा अशा स्थितीत पारा वाढतच चालला आहे. गेल्या दोन दिवसांत तापमानात दिवसगणिक दोन अंशाची वाढ झाली आहे. किमान तापमान १६ वरून १८ आणि कमाल तापमान ३६ वरून ३९ वर पोहोचले आहे. तापमानवाढीचा वेग कायम राहिल्यास थंड हवेचे ठिकाण व मिनी महाबळेश्वरची ख्याती असलेल्या जव्हारचे तापमान ४२ च्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.