शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 06:28 IST

‘सार्वजनिक आरोग्य’ने जारी केली कार्यपद्धती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गरीब व गरजू रुग्णांना आता पाच लाख रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या उपचारांसाठी शासकीय योजनेतून मदत मिळणार आहे. त्यासाठी  म. ज्योतिराव फुले जनआरोग्य व आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य या एकत्रित योजनांचा विस्तार करण्यात आला आहे. या योजनेची कार्यपद्धती स्पष्ट करणारा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवारी काढला. यामुळे मोठ्या शस्त्रक्रियांना आर्थिक आधार मिळणार आहे. 

रुग्णांना या शस्त्रक्रियांच्या उपचारांसाठी मिळेल मदत

अवयव प्रत्यारोपण (हृदय, यकृत, फुप्फुस इ.), कृत्रिम प्रत्यारोपण, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, हृदय व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन आदी.

अर्ज प्रक्रिया कशी असेल?

रुग्णालय रुग्णाच्या वतीने अर्ज करेल. आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करणे बंधनकारक असेल. ऑनलाइन प्रणाली विकसित होईपर्यंत ऑफलाइन अर्ज स्वीकारले जातील. छाननी समिती तपासणी करून प्रस्ताव पाठवेल. वैद्यकीय व निधी मंजुरी समिती वैद्यकीय पडताळणी, निधी मंजूर करणे यासाठी दर शुक्रवारी बैठक घेईल. विशेष उपचार सहाय्यता व सक्षमीकरण समिती अंतिम मंजुरी देईल.

योजनेसाठी अटी आणि निकष काय?

  • रुग्ण हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 
  • आधार कार्ड, रेशन कार्ड अनिवार्य असेल.
  • मंजूर निधी रुग्णालयाच्या बँक खात्यात जमा केला जाईल. 
  • रुग्णाला रोख व्यवहार करण्याची गरज नाही
  • सर्व प्रक्रिया ऑनलाइन/पारदर्शक पद्धतीनेच होईल.

पाच लाखांपेक्षा अधिक खर्च असलेले उपचारही आता दोन्ही योजनांमधील रुग्णांना घेता येतील. या संबंधीची कार्यपद्धती निश्चित झाली असल्याने खर्चाची चिंता कोणीही करण्याची गरज राहिलेली नाही.-प्रकाश आबिटकर, मंत्री सार्वजनिक आरोग्य विभाग

English
हिंदी सारांश
Web Title : Costly treatments now covered by government! Scheme details revealed.

Web Summary : Maharashtra residents can now access financial aid for treatments exceeding ₹5 lakh under expanded health schemes. This covers organ transplants, implants and bone marrow transplants. Hospitals apply on behalf of patients; transparent online processes ensure funds directly reach hospitals.
टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारHospitalहॉस्पिटल