शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल सहा महिने उलटून गेले तरीही राज्यमंत्री अधिकारांविनाच; उरले फक्त पदापुरते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 07:56 IST

किरकोळ अधिकार घेण्यास राज्यमंत्र्यांचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सहा महिने उलटूनही काही कॅबिनेट मंत्र्यांनी कामाचे वाटप न केल्याने राज्यमंत्र्यांना अधिकार मिळालेले नाहीत. त्यामुळे मंत्रिमंडळात असलेले राज्यमंत्री हे केवळ पदापुरते उरल्याचे चित्र आहे.  तीन राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना अधिकार वाटपाबाबत पत्र लिहिले असून तोंडी विनंतीही केली आहे.

सहा राज्यमंत्र्यांपैकी तीन मंत्र्यांकडे सहा आणि तीन मंत्र्यांकडे पाच खात्यांचा कार्यभार आहे. मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृहखात्याचे अधिकार पहिल्या दहा दिवसांतच त्यांनी आपल्या राज्यमंत्र्यांना दिले आहेत. तर ४ ते ५ कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना अधिकारांचे वाटप केलेले आहे. उर्वरित कॅबिनेट मंत्र्यांनी आपल्याकडील अधिकारांचे वाटप न केल्याने राज्यमंत्री हतबल आहेत.

दोन राज्यमंत्र्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, अधिकृतपणे कॅबिनेट मंत्र्यांनी अधिकारांचे वाटप केले नसले तरी नाराजी नाही. अधिकारात असलेले विषय आपण हाताळत आहोत. एका राज्यमंत्र्यांनी अधिकारांचे वाटप झाले नसल्याने काम कसे करायचे असा सवाल उपस्थित केला. एका राज्यमंत्र्याने सांगितले की, एका दिग्गज मंत्र्यांने आपल्याला कोणतेही अधिकार दिलेले नाहीत. 

उत्तरे देण्यास नकार

अधिकाराचे वाटप न झाल्याने एका राज्यमंत्र्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनात संबंधित खात्याची उत्तर देण्यास नकार देऊन आपली नाराजी उघड केली होती. फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्यमंत्र्यांकडे कोणते अधिकार होते याची यादीही या राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रासोबत जोडली आहे.

तक्रारींचे पाढे...

एका कॅबिनेट मंत्र्याने आपल्याला राज्यमंत्री म्हणून जे अधिकार मिळायला हवे होते ते खाली सचिवांकडे दिले आहेत,  तर एका कॅबिनेट मंत्र्याने किरकोळ अधिकार दिल्याने संबंधित राज्यमंत्र्याने ते घेण्यास नकार दिला.

टॅग्स :ministerमंत्री