शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

आयपीएस बनल्यानंतरही ‘अलाॅटमेंट इयर’ मिळेना, मूळच्या ‘मपोसे’ अधिकाऱ्यांत अस्वस्थता

By जमीर काझी | Updated: April 11, 2022 06:00 IST

राज्य पोलीस दलात सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर  आयपीएस (भापोसे) बनलेल्या ४३ अधिकाऱ्यांना  आयपीएस  वर्षाचे वाटप (अलॉटमेंट इयर बॅच) निश्चित झालेले नाही.

जमीर काझीमुंबई :

राज्य पोलीस दलात सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर  आयपीएस (भापोसे) बनलेल्या ४३ अधिकाऱ्यांना  आयपीएस  वर्षाचे वाटप (अलॉटमेंट इयर बॅच) निश्चित झालेले नाही. त्यातील निम्मे अधिकारी वर्षभरात पदोन्नतीसाठी पात्र ठरत आहेत. त्याची कार्यवाही गृह विभागाकडून रखडल्याने संबंधित अधिकाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

केंद्रीय सेवा दलातील आयपीएस पदासाठी प्रत्येक राज्यासाठी नेमून दिलेल्या पदांपैकी २५ टक्के कोटा राज्यातील अधिकाऱ्यांसाठी (मपोसे) राखीव असतो. त्यासाठी एमपीएससीतून उपअधीक्षक म्हणून नियुक्त झालेल्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार   सुमारे दोन दशकांच्या सेवेनंतर ही संधी मिळते. परंतु,  पोलीस मुख्यालयात कार्यरत थेट आयपीएस अधिकारी व गृह विभागाकडून त्याबाबतची केंद्रीय लोकसेवा आयोग व गृह मंत्रालयाशी करावयाची  प्रक्रिया धिम्या गतीने केली जाते. त्यामुळे आयपीएस नॉमिनेशन रखडते. ते जाहीर झाल्यानंतर वर्षभरात रिक्त जागा व सेवाज्येष्ठतेनुसार त्यांना आयपीएस वर्षांचे वाटप जाहीर होणे अपेक्षित असते. मात्र,  २०१७ साली आयपीएस झालेल्या मूळच्या मपोसे अधिकाऱ्यांना त्यांचे   वाटप झालेले नाही. त्यांचे आयपीएस ट्रेनिंग न होणे, कोरोना प्रादुर्भाव आदीच्या नावाखाली ते रखडले आहे.

२०१६चे गेल्या वर्षी नॉमिनेशनराज्यातील ८ मपोसे अधिकाऱ्यांचे २०१६ निवड वर्षात आयपीएस नॉमिनेशन झाले. त्यांना गेल्यावर्षी २०१०च्या आयपीएस वर्षाचे वाटप झाले आहे. त्यानंतर २०१७ व २०१८च्या निवड वर्षात प्रत्येकी १२, केडर पडताळणीतून ५ तर २०१९मध्ये ८, २०२०मध्ये ६ अधिकारी आयपीएस बनले आहेत. यातील २०१९ आणि २०२० सालची निवडसूची गेल्या १४ जानेवारीला जाहीर झाली आहे.

पदोन्नतीतून आयपीएस बनलेल्या अधिकाऱ्यांना वर्षाचे वाटप वेळेत झाले पाहिजे. त्याबाबतची कार्यवाही याबाबत आवश्यक बाबींची पूर्तता त्वरित करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली जाईल.- दिलीप वळसे-पाटील (गृहमंत्री)

टॅग्स :Policeपोलिस