शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

एसटी डेपोंमध्ये आचारसंहितेची ऐशीतैशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 05:51 IST

राजकीय फलकांवरून आगार व्यवस्थापकांना नोटीस; जाहिरातदार मात्र सुटले

मुंबई : राज्यातील विविध एसटी डेपोंसह बसेसवरून अद्याप राजकीय फलक हटविण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, जाहिरातींचे फलक व बॅनर हटविण्याचे काम जाहिरात देणाऱ्या शासकीय विभागाचे आणि कंपन्यांचे असल्याचे म्हणत, एसटी प्रशासनाने या प्रकरणात हात झटकले आहेत. मात्र, निवडणूक आयोगाकडून आगारांमधील आगार व्यवस्थापकांना नोटीस बजावण्यात आली आहे.राज्यातील आगार व्यवस्थापकांना या संदर्भात नोटीस धाडण्यात आली आहे, तर दुसरीकडे मुंबई सेंट्रलसह परळ एसटी आगार परिसरात मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांचे फोटो असलेले बॅनर मंगळवारीही कायम होते. याशिवाय राज्यभर धावणाऱ्या विविध एसटी आगारांमधील बसेसवर स्टीकर्स चिकटविल्याने ते काढण्यास विलंब होत असल्याचे प्रशासनाने सांगितले. मुळात या जाहिराती चिकटविण्याचे कंत्राट जाहिरातदार कंपन्यांनी घेतलेले आहे. त्यामुळे ते काढण्याचे कामही कंपन्यांनीच करायला हवे, असा युक्तिवाद एसटी कर्मचारी संघटना करत आहेत.एसटी प्रशासनानेही संबंधित काम त्या-त्या जाहिराती देणाºया शासकीय विभागांचे असल्याचे सांगितले, तसेच संबंधित विभागांसह एसटी प्रशासनाने नोटीस बजावल्याचा दावा केला आहे. दरम्यान, ज्या-ज्या ठिकाणी राजकीय प्रचाराचे बॅनर किंवा पोस्टर्स दिसतील, त्याठिकाणी तत्काळ कारवाई केली जाईल असे मुंबई जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी स्पष्ट केले. त्यानुसार आयोगाने आगार व्यवस्थापकांना खुलासा मागितला आहे.जिल्हा निवडणूक अधिकारी दखल घेणार का?मुंबईतही एसटी आगारांमधील राजकीय पक्षांचे बॅनर्स आणि पोस्टर्स अद्याप काढलेले नाहीत. त्यामुळे सर्रासपणे आचारसंहितेचे उल्लंघन करणाºया संबंधित घटकांना दोषी ठरवत जिल्हा निवडणूक अधिकारी काय कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.