शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

इतेहाद, जेट एअरवेजसोबत पर्यटन विभागाचा करार

By admin | Updated: April 26, 2017 02:00 IST

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत इतेहाद आणि जेट एअरवेज

मुंबई : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत इतेहाद आणि जेट एअरवेज या दोन विमान वाहतूक कंपन्यांबरोबर पर्यटन विभागाचा सामंजस्य करार करण्यात आला. देशातील आणि परदेशातील पर्यटकांचा राज्यात ओघ वाढून पर्यटनाला चालना मिळावी आणि विमान कंपन्यांच्या नेटवर्कचा फायदा मिळावा, यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला. फडणवीस म्हणाले की, यंदाचे वर्ष हे व्हिजिट महाराष्ट्र २०१७ म्हणून साजरे केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन मान्यवर हवाई वाहतूक कंपन्या आणि पर्यटन विभागामध्ये होत असलेला सामंजस्य करार हा महत्त्वपूर्ण आहे. या करारामुळे देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राची संस्कृती, येथील वेगळेपण, पर्यटनस्थळे पाहता येणे शक्य होणार आहे. पर्यटन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, या दोन विमान वाहतूक कंपन्यांचे इनफ्लाईट मॅगझीन, वेबसाईट, कंपन्यांकडून होणारे प्रवासी मेळावे, प्रदर्शने आदींच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संस्कृती, पर्यटनस्थळांची माहिती देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचिवली जाईल. (प्रतिनिधी)मुंबई शॉपिंग फेस्टीव्हल-पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी विविध रेस्टॉरंट असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, विविध खाजगी टॅक्सी कंपन्या, रेल्वे अशा सर्व खासगी-सार्वजनिक सेवांचे सहकार्य घेण्यात येत आहे. आयआरसीटीसी समवेत भागीदारीतून सावंतवाडी येथे रेल हॉटेल सुरु करण्यात येणार आहे. मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी दुबई फेस्टीव्हलच्या धर्तीवर २१ डिसेंबर २०१७ ते ६ जानेवारी २०१८ कालावधीत मुंबई मेला शॉपिंग फेस्टीव्हल होणार आहे. कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, या विभागाचे नविनयुक्त प्रधान सचिव नितीन गद्रे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक डॉ. के. एच. गोविंदराज, इतेहाद एअरवेजच्या प्रादेशिक महाव्यवस्थापक नीरजा भाटीया, जेट एअरवेजचे प्रमुख वाणिज्य अधिकारी जयराज षण्मुगम आदी उपस्थित होते.