शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally Live Update : ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! महाराष्ट्रभरातून मराठीप्रेमी मुंबईत, सभास्थळी मोठी गर्दी
2
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
3
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
4
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
5
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
6
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
7
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
8
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
9
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
10
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
11
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
12
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
13
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
14
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
15
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
16
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
18
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
19
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
20
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

एसटीला ‘टेन्शन’ तोट्यातील आगारांचे

By admin | Updated: May 9, 2015 01:19 IST

एसटी महामंडळ तोट्यातून नफ्यात येण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असून, यात आगारांचा (डेपो) तोटा कमी करताना मात्र महामंडळाच्या चांगलेच

मुंबई : एसटी महामंडळ तोट्यातून नफ्यात येण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असून, यात आगारांचा (डेपो) तोटा कमी करताना मात्र महामंडळाच्या चांगलेच नाकीनऊ येत आहेत. एसटीचे २५0पैकी तब्बल २११ आगार तोट्यात असून, गेल्या वर्षभरात फक्त नऊ आगारांचा नफा वाढविण्यात महामंडळाला यश आले आहे. त्यामुळे तोट्यातील आगारांचे एसटीला टेन्शन असून, हा तोटा कमी करायचा तरी कसा, असा प्रश्न पडला आहे. एसटी महामंडळाचे राज्यात २५0 आगार असून, यामधून जवळपास १७ हजार गाड्यांची वाहतूक होते. मोठ्या प्रमाणात एसटीच्या सर्व आगारातून बसेस चालविल्या जातानाच कर्मचारी संख्या, बसेससाठी लागणारी साहित्य-सामग्री, वीज, डिझेल एसटीच्या आगारांमध्ये लागत आहे. यासाठी खर्च करताना एसटीच्या नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे होणारा खर्च महामंडळाला परवडत नसून तो कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे २0१२मध्ये कामगार करारानुसार पगाराची पुनर्रचना झाल्यानंतर एसटी महामंडळावर आर्थिक ओझे अजूनच वाढत गेल्याचे सांगण्यात येते. सध्या प्रत्येक आगारात वाढलेले मनुष्यबळ, पगाराची झालेली पुनर्रचना, डिझेलचा वाढलेला खर्च ही प्रमुख कारणे आगार तोट्यात जाण्यास कारणीभूत ठरली आहेत. त्यामुळे २0१४-१५मध्ये २५0पैकी तब्बल २११ आगार तोट्यात गेलेत; तर ३९ आगार नफ्यात आहेत. २0१३-१४मध्ये २५0पैकी ३0 आगार नफ्यात होते. हे पाहता यंदाच्या आर्थिक वर्षात नऊ आगारच नफ्यात आले. याबाबत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांना विचारले असता ते म्हणाले, यंदा ३९ आगार फायद्यात आहेत. २0१२पासून तोट्यातील आगारांची संख्या वाढत गेली आहे. पगाराची झालेली पुनर्रचना आणि वाढलेले मनुष्यबळ त्यास कारणीभूत ठरत आहे. तोटा होत असला तरी यातील कोणतेही आगार बंद करण्याचा विचार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.