शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

दुष्काळग्रस्तांसाठी ‘नाम’ फाउंडेशनची स्थापना

By admin | Updated: September 16, 2015 01:07 IST

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकाराने ‘नाम’ फाउंडेशन या धर्मदाय संस्थेची स्थापना केली असून, संस्थेच्या माध्यमातून

पुणे : दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकाराने ‘नाम’ फाउंडेशन या धर्मदाय संस्थेची स्थापना केली असून, संस्थेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांसाठी निधी उभारण्यात येणार आहे.नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या विधवांना वैयक्तिक स्तरावर मदत करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. या उपक्रमाला आणखी व्यापक दिशा देण्यासाठी आणि दुष्काळग्रस्तांना आर्थिक आधार देण्यासाठी नाना आणि मकरंद यांनी ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा केली होती. मंगळवारी हा संकल्प प्रत्यक्षात उतरला. नाना पाटेकर म्हणाले, की संस्थेत जमा होणाऱ्या निधीमधून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १५ हजारांची मदत करण्यात येईल. २०१३, १४ आणि १५ या तीन वर्षांमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात येईल. त्याचबरोबर दुष्काळी भागातील जनतेला रोजगार उपलब्ध करून देणे, पारंपरिक ऊर्जास्रोत शोधून त्याचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. निधी जमा करण्यासाठी ‘नाम’ फाउंडेशनच्या नावाने स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेत खाते उघडण्यात आले आहे. इच्छुकांनी खाते क्रमांक ३५२२६१२७१४८ वर (आयएफसी एसबीआयएन ०००६३१९) धनादेश जमा करून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचे आवाहन नानांनी केले. चहावाल्याची मदत ! संस्थेची नोंदणी करण्यासाठी नाना पाटेकर धर्मदाय सहआयुक्त कार्यालयात पोहोचल्यानंतर अनेकांनी तेथेच त्यांच्याकडे पैसे सोपविले. धर्मदाय सहआयुक्त कार्यालयात चहा घेऊन येणाऱ्या चहावाल्यानेही तातडीने पाटेकर यांच्याकडे दोन हजार रुपयांची मदत सुपुर्द केली.बारामतीच्या तरुणाईचा हात : बारामतीमधील तरुणांनी उस्मानाबादमधील आंबी गावात १५० कुटुंबांना प्रत्येकी १० किलो बाजरी आणि १० किलो तांदूळ असे३ टन धान्याचे वाटप केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून बारामतीकरांना आवाहन करीत त्यांनी मदत मिळविली. एक दिवसाचे वेतन : धुळे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आयुक्त डॉ़ नामदेव भोसले यांनी दिली.