शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञाननिष्ठ, आधुनिक देशासाठी भारतीय बुद्धिस्ट संघाची स्थापना

By admin | Updated: April 10, 2015 02:19 IST

हिंसा, जातीयवाद, अंधश्रद्धा यापासून समाजाला दूर ठेवण्यासाठी व देव नाही या बाबीला रुजविण्यासाठी ‘भारतीय बुद्धिस्ट संघा’ची स्थापना करण्यात आली असून

चौका (जि. औरंगाबाद) : हिंसा, जातीयवाद, अंधश्रद्धा यापासून समाजाला दूर ठेवण्यासाठी व देव नाही या बाबीला रुजविण्यासाठी ‘भारतीय बुद्धिस्ट संघा’ची स्थापना करण्यात आली असून, खऱ्या अर्थाने भारताला महासत्ता बनवायचे असेल तर अहिंसा, स्वातंत्र्य, समता, बंधुता याबरोबरच बुद्धांच्या शिकवणुकीची गरज असल्याचे संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. पी.आर. ढाले यांनी सांगितले.सर्व समाजाला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी व बुद्धांची शिकवण सर्वांना देण्याकरिता भारतीय बुद्धिस्ट संघ महाराष्ट्रभर प्रसार करीत असून, पहिल्या टप्प्यात आत्तापर्यंत संघाचे २ लाख ५० हजार सभासद झाले असल्याचेही ढाले म्हणाले. भारतीय बुद्धिस्ट संघाचे उद्घाटन शनिवार, दि. ११ एप्रिल २०१५ रोजी म्हणजेच महात्मा जोतिबा फुले जयंतीदिनी होणार असून, १० हजार सभासद उपस्थित राहतील. उद्घाटनास प्रमुख वक्त्या म्हणून प्रा. सुषमा अंधारे उपस्थित राहणार असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेल्या व्यक्तीही हजेरी लावणार आहेत. संघाने २४ तास हेल्पलाईन नं. ८८८८१२२२२८ सुरू केला आहे. या नंबरवर संपर्क साधून सभासदही होता येईल. संघात अधिकारी, कर्मचारी, अभियंते, वकील, बँक कर्मचारी, अधिकारी, प्राध्यापक, शिक्षकांसह कोणालाही सहभागी होता येईल, असेही ते म्हणाले. संघातर्फे महाराष्ट्रभर बुद्धिस्ट सभागृह उभारले जात असून, प्रत्येक तालुक्याच्या मतदार यादीतून जिल्हा प्रतिनिधी, तीन जिल्ह्णांतून एका विभागाचा प्रतिनिधी असे १२ विभागीय प्रतिनिधी मार्गदर्शन करणार असून, बुद्धिस्ट सभागृहाची वर्षातून चार अधिवेशने होणार आहेत. तीन महिन्यांच्या खंडानंतर ती भरवली जाणार आहेत. पहिले अधिवेशन २ जून २०१५ रोजी चौका (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील मुख्यालयात होणार असल्याचे अ‍ॅड. ढाले यांनी सांगितले.