शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गणपती बाप्पांची बसमध्ये स्थापना; रोज प्रवासी करतात बाप्पाची पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 13:50 IST

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा ते मध्यप्रदेशातील भैसदेही- बैतूल मार्गावर चालणाऱ्या एका खासगी बसमध्ये गणेशाची स्थापना करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअमरावती जिल्ह्यातील परतवाडा ते मध्यप्रदेशातील भैसदेही- बैतूल मार्गावर चालणाऱ्या एका खासगी बसमध्ये गणेशाची स्थापना करण्यात आली आहे.बसमधील प्रवासी श्रींची आरती करतात.सध्या ही बस या भागात चर्चेचा विषय ठरली आहे. 

परतवाडा, दि. 31- अमरावती जिल्ह्यातील परतवाडा ते मध्यप्रदेशातील भैसदेही- बैतूल मार्गावर चालणाऱ्या एका खासगी बसमध्ये गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. बसमधील प्रवासी श्रींची आरती करतात. सध्या ही बस या भागात चर्चेचा विषय ठरली आहे. गणरायांची स्थापना घरोघरी, सार्वजनिक गणेश मंडळांत, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये, कारखान्यांमध्ये होताना आपण बघितलं, पण परतवाडा येथील एका खासगी बसचालकाने गाडीतच गणेशाची स्थापना केल्याची ही पहिलीच वेळ असावी, असं मत नागरिकांतून व्यक्त होत आहे. 

बसमधील चालकाच्या कॅबिनमधील बोनेटवर गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली आहे. खडबडीत रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्यामुळे मूर्ती त्याच ठिकाणी राहावी, यासाठी विशेष सुविधा करण्यात आली आहे. गणेशासाठी छोटे मंदिरही येथे तयार करण्यात आले आहे. ही बस दररोज सकाळी १० वाजता भैसदेही येथे पोहोचते. तेव्हा येथील जयस्वाल पेट्रोल पंपावर बाप्पाची आरती केली जाते. सायंकाळची आरती परतवाडा येथे केली जाते. यानंतर बसमधील सर्व प्रवाशांना प्रसादाचे वितरण केलं जाते. बसमध्ये चढणारे व उतरणारे सर्व प्रवासी बाप्पांचं दर्शन घेतात. 

सध्या ही बस परतवाडा, भैसदेही, बैतूल मार्गावर चर्चेचा विषय ठरली आहे. या मार्गावरील लहान मोठ्या गावांतील प्रवासी व नागरिक ही बस पाहण्यासाठी येत आहेत. चालक बाबू यादव व वाहक आशिष कनाठे हे बाप्पांच्या प्रसादाची सोय आपल्या पैशातून करतात. 

ही बस आमचे एकप्रकारे घरच आहे. त्यामुळे आम्ही यात गणेशाची स्थापना केली आहे. प्रत्येक प्रवासी कोणत्या ना कोणत्या अडचणीत असतो. श्रीगणेशाला पाहून त्याचा थोडा ताण कमी व्हावा, हादेखील एक हेतू आहे, असं आशिष कनाठे म्हणाले आहेत.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव