शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा दोन लाख गणेश मुर्तींचे पर्यावरण पुरक विसर्जन

By admin | Updated: September 16, 2016 17:38 IST

शहरातील घरगुती स्वरूपात प्रतिष्ठापना केल्या जणाºया साडे तीन लाख गणेश मुर्तींपैकी सव्वा दोन लाख मुर्तींचे हौदात तसेच घरच्या घरी पर्यावरण पुरक पध्दतीने विसर्जन करण्यात आले आहे

पुणेकरांनी घालून दिला आदर्श 
पुणे, दि. 16 - शहरातील घरगुती स्वरूपात प्रतिष्ठापना केल्या जणाºया साडे तीन लाख गणेश मुर्तींपैकी सव्वा दोन लाख मुर्तींचे हौदात तसेच घरच्या घरी पर्यावरण पुरक पध्दतीने विसर्जन करण्यात आले आहे. महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन २५ हजार कुटुंबियांनी अमोनियम बायकार्बोनेटच्या मदतीने घरच्या घरी विसर्जन केले तर उर्वरित २ लाख गणेश मुर्तींचे पालिकेल्या हौदात विसर्जन झाले. यंदा पहिल्यांदाच पर्यावरणपुरक विसर्जनाला इतक्या मोठयाप्रमाणात प्रतिसाद मिळाला असून सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ रोवणाºया पुण्याने पर्यावरण पुरक गणेश विसर्जनाचा आर्दश घालून दिला आहे. 
महापालिका, एनसीएल व कमिन्स इंडियाच्या संयुक्त विद्यमाने यंदा अमोनियम बायकार्बोनेट बादलीमध्ये मिसळून त्यामध्ये गणेश मुर्तींचे विसर्जन करण्याची पध्दत विकसित करण्यात आली. त्यासाठी नागरिकांना क्षेत्रिय कार्यालयांच्या माध्यमातून मोफत अमोनियम बायकार्बोनेट उपलब्ध करून देण्यात आले. नागरिकांनी घरच्या घरी गणेश मुर्तींचे विजर्सन करावे असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. दहा दिवसांच्या कालावधीमध्ये क्षेत्रिय कार्यालयामधून नागरिकांना ५५ टन अमोनियम बायकार्बोनेट वाटप करण्यात आले.  अनेक सोसायटया या उपक्रमामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी झाल्या. एकूण २४ हजार २५० मुर्त्यांचे घरच्या घरी विसर्जन करण्यात आले. पाण्यामध्ये गणेश मुर्ती विरघळल्यानंतर ते द्रावण झाडांसाठी खत म्हणून वापरण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण न होता चांगले खत या उपक्रमातून मिळू शकले.
महापालिकेकडील नोंदीनुसार शहरात एकूण ३ लाख ५३ हजार ८८९ गणेश मुर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी पालिकेच्या हौद व लोखंडी टाक्यांमध्ये २ लाख ५ हजार ९४ गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन घाट, नदीपात्र, विहीर यामध्ये ९३ हजार ६९६ गणेश मुर्ती विसर्जित करण्यात आल्या. महापालिका, अंधश्रध्दा निर्मुलन समिती, एनसीएल, कमिन्स इंडिया व इतर स्वंयसेवी संस्थांकडून सातत्याने पर्यावरण पुरक विसर्जनासाठी प्रबोधन करण्यात येत आहे. गणेशोत्सवापूर्वी शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन याबाबत प्रबोधन करण्यात आले होते. त्यामुळे पर्यावरण पुरक गणेश विसर्जन मोहीमेला खुपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
सर्वाधिक गणेश मुर्तींचे विसर्जन शेवटच्या दहाव्या दिवशी झाले. हौदामध्ये ८३ हजार ४८१ व लोखंडी टाक्यांमध्ये ३० हजार ९६५ मुर्त्यांचे दहाव्या विसर्जन झाले. पहिल्या दिवशी ३२६ गणेश मुर्तींचे विसर्जन झाले. दुसºया दिवशी १४ हजार ७८१ मुर्ती विसर्जित झाल्या.