शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांच्या प्रवेशावर शिवसेनेतच दोन गट; जुन्या शिवसैनिकांचा पाठिंबा, नव्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 05:02 IST

संजय पाठक । लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा असून ...

संजय पाठक ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा असून त्यांच्या संभाव्य प्रवेशावरून शिवसेनेतच दोन गट पडल्याचे दिसून येते. जुन्या शिवसैनिकांचा भुजबळांना पाठिंबा, तर विद्यमान पदाधिकाऱ्यांचा विरोध, असे चित्र आहे.२८ वर्षांपूर्वी छगन भुजबळ यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर ते राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये दाखल झाले.

पक्षाने त्यांना उपमुख्यमंत्रिपद दिले. ओबीसी समाजातील प्रमुख नेते अशी ओळख असलेले भुजबळ धडाडी आणि स्पष्टवक्तेपणामुळे सतत चर्चेत असतात. गृहमंत्री असताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचे धाडस दाखवले होते. तेव्हापासून शिवसैनिकांचा त्यांना कडवा विरोध आहे. मात्र, गेल्या काही वर्षात बरेच पाणी वाहून गेले. स्वत: भुजबळ मातोश्रीवर जावून बाळासाहेबांना भेटले होते. त्यानंतर भुजबळ आणि शिवसेना यांच्यातील कटुता मावळली.

बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्टÑ सदन घोटाळा या प्रकरणात भुजबळांना ईडीने अटकही केली. दीड ते दोन वर्ष ते कोठडीत होते. सध्या ते जामिनावर आहेत. या प्रकरणांमुळे त्यांच्याविषयी द्वेष करणारा जसा वर्ग आहे, तसे सहानुभुती बाळगणारेही आहेत. या प्रकरणांतून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी त्यांना सत्तेची जवळीक हवी आहे, असे काहींना वाटते. राष्टÑवादी काँग्रेसची सध्या शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे. मात्र भुजबळ अजून या यात्रेकडे फिरकले नाही. राष्टÑवादीपासून त्यांनी अंतर राखल्याचे दिसून येते. मात्र, स्वत: भुजबळ यांनी याचा इन्कार केला आहे. शिवसेना प्रवेशाच्या वृत्ताचाही त्यांनी इन्कार केला आहे.

दुसरीकडे भुजबळांच्या संभाव्य शिवसेनाप्रवेशावरून शिवसैनिकांत दोन गट पडल्याचे दिसून येते. गेल्याच आठवड्यात नाशिकमधील काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन भुजबळांना पक्षात घेण्यास विरोध दर्शविला. भुजबळ यांच्या आगमनाने पक्षाची हानी होईल, असे त्यांनी सांगितले. तर भुजबळ शिवसेनेत यावेत, असाही एक मतप्रवाह आहे. विशेषत: अनेक जुने शिवसैनिक जे भुजबळ यांच्या तालमीत तयार झाले, ते भुजबळांच्या शिवसेना प्रवेशास अनुकुल आहेत. परंतु यासंबंधीचा निर्णय ‘मातोश्री’वर सोपविला आहे. 

छगन भुजबळ यांना शिवसेना ज्ञात आहे. त्यांना पक्षात घ्यावे किंवा न घ्यावे या विषयावर बोलण्याइतपत मी मोठा नेता नाही. त्यासंदर्भात पक्षाचे नेते उद्धव ठाकरे हेच योग्य तो निर्णय घेतील.- विनायक पांडे, माजी महापौर, शिवसेना, नाशिक

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळ