शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजी भाषेने पोट भरेल, पण मन नाही

By admin | Updated: March 13, 2016 02:05 IST

राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाचे उद्घाटनप्रसंगी दासू वैद्य यांचे प्रतिपादन.

हर्षनंदन वाघ/बुलडाणा मराठी भाषेचे व्यावसायिक महत्त्व सिद्ध न करता आल्यामुळे इंग्रजीचं स्तोम माजले आहे. चांगल्या दज्रेदार मराठी शाळा आपल्याला चालवता आल्या नाहीत. अशा परिस्थितीत इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलांना मराठी साहित्याकडे जाणीवपूर्वक वळवावे लागेल. इंग्रजी भाषेने पोट भरेल; पण मन भरणार नाही, असे मत राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी दासू वैद्य यांनी व्यक्त केले.स्थानिक गर्दे वाचनालयाच्या संत चोखामेळा साहित्य परिसरात राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संमेलनाचे उद्घाटक कवी, गीतकार प्रसाद कुलकर्णी, स्वागताध्यक्ष अरुणा कुल्ली, निमंत्रक आमदार हर्षवर्धन सपकाळ व अन्य मान्यवर उपस्थित होते. आजचे बालकुमार, युवकांची पिढी गतिमान असून, त्यांच्यासमोर असलेली आधुनिक प्रसार माध्यमे गोंधळ निर्माण करीत आहेत. माध्यमाद्वारे काही चुकीच्या बाबी समोर येतात, असे नाही; पण अधिक विचारपूर्वक ही माध्यमे वापरण्याची वेळ आली आहे. केवळ माध्यमेच नव्हे तर समाज व कुटुंबानेही जबाबदारी घेऊन बाल कुमारांशी संवाद वाढवण्याचे काम झाले पाहिजे, त्यासाठीच अशी साहित्य संमेलने आवश्यक असल्याचे मत वैद्य यांनी मांडले. आयुष्याचे पुस्तक वाचता आले तर तो जीवनात यशस्वी होतो. आयुष्यात मोठे व्हायचे असेल, तर विचार, संस्कृतीचे अभिसरण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रसाद कुलकर्णी यांनी केले.