शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वर्षपूर्तीलाच बीआरटी अंधारात

By admin | Updated: August 26, 2016 00:54 IST

प्रवाशांना सवलतीच्या दरात पास देऊन प्रवासी वाढीसाठीचा आनंदोत्सव साजरा करण्याची तयारी पीएमपी प्रशासन आणि महापालिकेने सुरू केली

पुणे : संगमवाडी बीआरटी मार्गाच्या वर्षपूर्तीनिमित्त प्रवाशांना सवलतीच्या दरात पास देऊन प्रवासी वाढीसाठीचा आनंदोत्सव साजरा करण्याची तयारी पीएमपी प्रशासन आणि महापालिकेने सुरू केली आहे. मात्र, ज्या मार्गाची वर्षपूर्ती होणार आहे, त्या मार्गावरील संगमवाडी येथील दोन बसथांब्याची बत्ती महावितरणने गुल केली आहे. या थांब्यासाठीचे वीजबिल न भरल्याने या ठिकाणचे वीजमीटर महावितरणने जप्त केले आहेत. त्यामुळे या मार्गाची प्रथम वर्षपूर्ती अंधारातच होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिका आणि पीएमपी प्रशासनाकडून मागील वर्षी १ सप्टेंबर रोजी विश्रांतवाडी ते संगमवाडी या मार्गावर बीआरटी सेवा सुरू करण्यात आली होती. त्याला पुढील आठवड्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, एका वर्षातच या मार्गाची प्रचंड दुरवस्था झालेली असून, अनेक स्थानकांवरील वीजपुरवठाही खंडित असल्याचे समोर आले आहे. पीएमपी प्रवासी मंचाचे कार्यकर्ते प्रतीक धात्रक यांनी प्रत्यक्ष संगमवाडी-विश्रांतवाडी या मार्गाची बीआरटी २० आॅगस्ट व २५आॅगस्ट २०१६ रोजी केलेल्या पाहणीत या मार्गावर असलेल्या अनेक गंभीर बाबी निदशर्नास आल्या आहेत. त्यात या दोन थांब्यांवरील मीटर जप्त केल्याचेही समोर आले आहे.(प्रतिनिधी)>स्थानकाचे दरवाजे २४ तास धोकादायकरीत्या सताड उघडे असणे, आयटीएमएस, प्रवासी माहिती यंत्रणा बंद असल्याने प्रवाशांना येणारी बस पाहण्यासाठी धोकादायकरीत्या डोकवावे लागणे, बीआरटी स्थानकात व मार्गावर रात्री पूर्ण अंधार असणे, हायटेन्शन वायर स्थानकात धोकादायक स्वरूपात लटकणे, संगमवाडी ट्रान्स्फर स्थानक, आयटीएमएस, अद्ययावत प्रवासी उपयुक्त माहिती, आसनव्यवस्था, तिकीट व पास केंद्र ई सह अद्यापही कार्यरत नाही. अखंडित वीजपुरवठ्यासाठी सर्व थांब्यांवर व स्थानकात इन्व्हर्टर व्यवस्था अत्यावश्यक आहे. सध्या वीजपुरवठा नसल्यास सर्व बीआरटी थांब्यांचे दरवाजे धोकादायकरीत्या खुले ठेवण्यात आले आहेत.