शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनाच्या शेवटी सरकारला डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 04:39 IST

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारसाठी विधिमंडळाच्या चालू अधिवेशनाचे शेवटचे चार दिवस अत्यंत डोकेदुखीचे ठरतील, अशी चिन्हं आहेत.

मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारसाठी विधिमंडळाच्या चालू अधिवेशनाचे शेवटचे चार दिवस अत्यंत डोकेदुखीचे ठरतील, अशी चिन्हं आहेत. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी अधिवेशन पुन्हा सुरू होताना सरकारची कसोटी लागणार आहे.गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी मंगळवारपासून पुन्हा आक्रमक होईल. त्यातच एमआयडीसीने शेतकºयांच्या हजारो एकर जमिनी मोकळ्या केल्याच्या मुद्यावरून उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना घेरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. एमआयडीसीसाठी संपादनाची नोटीस देण्यात आलेल्या जमिनी मूळ मालकांना कालांतराने परत करण्याचे हे प्रकरण आहे. नियमानुसार अशा जमिनी परत करता येतात पण तसे करताना आतबट्टयाचे व्यवहार झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे. अर्थात अधिवेशनाच्या उर्वरित चार दिवसांत विरोधक ते कसे सिद्ध करतात हे महत्त्वाचे असेल.सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यातील लोकमंगल कारखान्याने शेतकºयांच्या नावावर परस्पर कर्ज उचलल्याप्रकरणी आता शेतकरीच रस्त्यावर आले आहेत. या मुद्यावरून विरोधक त्यांची अधिवेशनात कोंडी करतील, अशी शक्यता आहे.मराठा मोर्चाचे आव्हानआरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाचा अभूतपूर्व मोर्चा ९ आॅगस्टला मुंबईत धडकणार आहे. या मोर्चाची हाताळणी, मोर्चेकºयांच्या मागण्यांबाबत घ्यावयाची भूमिका यावरूनही फडणवीस सरकारची परीक्षाच असेल.मराठा समाजाच्या मोर्चाची योग्य रीतीने हाताळणी हा मुख्यमंत्री देवेंद्र यांचा आगामी दोन दिवसांसाठीचा अजेंडा असेल. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की मेहता यांच्या राजीनाम्याबाबत वा त्यांना मंत्रिमंडळातून काढण्याबाबत कोणतीही चर्चा अद्याप भाजपात वरिष्ठ पातळीवर झालेली नाही. मुख्यमंत्री विधिमंडळात मेहतांची पाठराखण करतील, अशी शक्यता अधिक आहे.प्रकाश मेहतांच्या राजीनाम्यावर आम्ही ठाम आहोत. या शिवाय, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीच्या जमिनी मोकळ्या केल्याचे प्रकरण भयंकर आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या ‘लोकमंगल’ने फसवणूक केल्याचा आरोप करीत शेतकरीच रस्त्यावर उतरले आहेत. पारदर्शकतेवरील या प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावीच लागतील.- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा.