शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

एका युगाचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 05:48 IST

अरुण दाते यांच्या काळातील गाणी असे म्हणण्यापेक्षा दाते हे स्वत:च एक युग होते. कुठल्याही प्रसंगात दाते यांची गाणी चपखल बसायची. ‘अर्ध्यावरती डाव मोडला...’ हे गाणे किती ठिकाणी वापरले आहे, या गाण्याची ताकदच निराळी. आवाजातून भावना व्यक्त करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे गाणी मनामनात रुजली. दाते यांनी जे गावोगावी कार्यक्रम केले, ते सोपे नव्हते. ३०-४० वर्षांपूर्वी मूलभूत सोयी-सुविधा नसताना महाराष्ट्रातल्या गावागावांत कार्यक्रम केले, त्यातून दाते यांनी गाणी रुजविली.

- सलील कुलकर्णीअरुण दाते यांच्या काळातील गाणी असे म्हणण्यापेक्षा दाते हे स्वत:च एक युग होते. कुठल्याही प्रसंगात दाते यांची गाणी चपखल बसायची. ‘अर्ध्यावरती डाव मोडला...’ हे गाणे किती ठिकाणी वापरले आहे, या गाण्याची ताकदच निराळी. आवाजातून भावना व्यक्त करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे गाणी मनामनात रुजली. दाते यांनी जे गावोगावी कार्यक्रम केले, ते सोपे नव्हते. ३०-४० वर्षांपूर्वी मूलभूत सोयी-सुविधा नसताना महाराष्ट्रातल्या गावागावांत कार्यक्रम केले, त्यातून दाते यांनी गाणी रुजविली.योगायोगाने पुण्यात असताना आम्ही एकाच इमारतीत राहायचो. त्या इतक्या वर्षांच्या सहवासात रोज भेट व्हायची, पण कधीच चेहरा पडलेले दातेकाका पाहिलेले नाही. चिडलेले, दुर्मुखलेले दातेकाका कधीच नसायचे. १९९८ ला माझ्या पहिल्या अल्बमचे अनावरण दातेकाकांच्या हस्ते झाले होते. त्या वेळी त्यांनी शाबासकी देताना म्हटले होते, स्वत:चे गाणे घेऊन स्वत:ची वाट शोधणारे खूप आवडतात अन् तुझा तोच प्रयत्न आहे. ‘हुरहुर असते तीच उरी...’ या गाण्याला त्यांनी दिलेली दाद अविस्मरणीय आहे. एका कार्यक्रमात मी गायल्यानंतर त्यांचा फोन आलेला. ‘अरे यार... क्या बात है’ अशी इंदोरी पद्धतीने दिलेली दाद कायमच लक्षात राहील. त्यांचा आवाज हा गझल गायनासाठी परफेक्ट होता, मात्र मराठी भावसंगीताचं भाग्य म्हणून ते याच क्षेत्रात राहिले. त्यांच्या गाण्यातला हळवेपणा स्वभावात होता. तो हळवेपणा त्यांची पत्नी गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर पाहिला होता. दातेकाकांसारख्या माणसाचे ‘असणे’ही खूप असते, म्हणजे ते आजारी असले तरी त्यांचे अस्तित्वही आधार देणारे होते. त्यांचे जाणे हे पोरके करणारे आहे.(शब्दांकन : स्नेहा मोरे)

टॅग्स :arun datearun datenewsबातम्या