शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबर अखेर ‘स्लीपर शिवशाही’ धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 04:41 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शयनयान (स्लीपर) शिवशाही आता प्रवासी सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज होत आहे. डिसेंबरअखेर वातानुकूलित शिवशाही आंतरराज्य मार्गावर धावणार आहेत.

महेश चेमटेमुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शयनयान (स्लीपर) शिवशाही आता प्रवासी सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज होत आहे. डिसेंबरअखेर वातानुकूलित शिवशाही आंतरराज्य मार्गावर धावणार आहेत. ही शिवशाही ३० आसनी असणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुणे येथून आंतरराज्य मार्गावर ही स्लीपर शिवशाही धावणार आहे. भाडेतत्त्वावर असलेल्या १५० शिवशाही मार्च अखेर रस्त्यावर उतरतील. ‘स्लीपर शिवशाही’मुळे एसटी महामंडळाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला जाणार आहे.एसटी महामंडळाची वातानुकूलित आणि अत्याधुनिक ‘ड्रीम एसटी’ म्हणून शिवशाही ओळखली जाते. २ बाय १ अशी आसन व्यवस्था असलेल्या या बसमध्ये एकूण ३० प्रवासी एकाचवेळी प्रवास करू शकतील. पूर्ण वातानुकूलित असलेल्या या एसटीत मोबाइल चार्जिंगसह मोबाइल रॅकची सोय आहे. बैठक आसनी शिवशाहीप्रमाणे सर्व सुविधा या बसमध्येदेखील आहेत. प्रवाशांच्या मागणीनुरूप चादर आणि उशी महामंडळातर्फे प्रवाशांना पुरवण्यात येईल.पहिल्या टप्प्यांतर्गत ४६० शिवशाही एसटी ताफ्यात दाखल होतील. सध्या १०७ शिवशाही महामंडळाच्या ताफ्यात आहेत. यात महामंडळाच्या स्वमालकीच्या ७० आणि भाडेतत्त्वावर ३७ बसेसचा समावेश आहे.मुंबई आणि पुणे येथून आंतरराज्य मार्गावर स्लीपर शिवशाही धावणार आहे. मुंबई-हैदराबाद, मुंबई-पणजी आणि मुंबई-नागपूर अशा संभाव्य मार्गावरून स्लीपर एसटी धावणार आहे. पुणे येथून पुणे-सुरत, पुणे-पणजी आणि पुणे-इंदौर या संभाव्य मार्गावर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.मार्च अखेर २ हजार शिवशाही महामंडळाच्या ताफ्यात दाखल होतील. त्यात स्लीपर शिवशाहीचादेखील समावेश आहे. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर तीन टप्प्यांत प्रवासी सेवेत त्या दाखल होतील. पहिल्या टप्प्यांतर्गत डिसेंबरअखेर स्लीपर शिवशाही महामंडळातील प्रवाशांसाठी उपलब्ध होतील. लांब पल्ल्यांच्या अंतरावर त्या चालवण्यात येतील.- रणजीत सिंह देओल,एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक