शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

डिसेंबरअखेर बँक सुरू होणार

By admin | Updated: November 7, 2014 00:46 IST

केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय आणि नाबार्डच्या अहवालानंतर नागपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेला आर्थिक परवाना मिळून व्यवहार यावर्षीच्या डिसेंबरअखेर सुरू होण्याचे संकेत आहेत.

नागपूर जिल्हा बँक : शेतकऱ्यांना कर्जपुरवठा शक्यनागपूर : केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय आणि नाबार्डच्या अहवालानंतर नागपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेला आर्थिक परवाना मिळून व्यवहार यावर्षीच्या डिसेंबरअखेर सुरू होण्याचे संकेत आहेत. कर्जवसुलीनंतरच शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज पुरवठा करणे शक्य असल्याची माहिती आहे.बँकेकडे पुरेसा फंडकेंद्र व राज्य सरकार आणि नाबार्डच्या मदतीने बँक कशी सुरू होणार, यावर चर्चा सुरू आहे. बँकिंग तज्ज्ञांनी सांगितले की, बँकेकडे पुरेसा फंड आहे. नियमानुसार बँकेचा एसएलआर (ठेवीच्या बदल्यात गुंतवणूक) २२ टक्के असायला हवा, पण तो २५ टक्के अर्थात १६५ कोटी आहे. शिक्षकांचे पगार अन्य बँकेतून व्हायला लागले, त्यावेळी जिल्हा बँकेचे शिक्षकांवर २३५ कोटींचे कर्ज होते. त्यातून ६० कोटी रुपये वसूल झाले आहेत आणि १०० कोटी रुपये वसूल होतील, अशी अपेक्षा आहे. याआधी बँकेला व्यवहार सुरू करण्यासाठी ३१ मार्च २०१४ पर्यंत ९३ कोटी अर्थात ४ टक्के सीआरएआर (कॅपिटल रिस्क वेट अ‍ॅसेट रेशो)ची गरज होती. त्यानुसार पूर्वीच्या राज्य शासनाने १९ जून २०१४ च्या कॅबिनेट बैठकीत ९२.९४ कोटी रुपये मंजूर केले होते. पण रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ३१ मार्च २०१५ पर्यंत बँकेला ७ टक्के सीआरएआर कायम ठेवावा लागेल. ही रक्कम १३१ कोटी एवढी आहे. तसे पाहता एवढीही रक्कम बँकेला लागणार नाही. पण नाबार्डच्या धोरणानुसार ती आवश्यक आहे. सध्या बँकेकडे एसएलआरचे १६५ कोटी आणि शिक्षकांकडून वसूल झालेले ६० कोटी असे एकूण २२५ कोटी आहेत. केंद्राच्या धोरणानुसार बँकेला १३१ कोटी रुपये मिळाल्यास बँकेकडे ३५५ कोटी रुपये होतील; शिवाय शिक्षकांकडून १०० कोटींची वसुली झाल्यास ही रक्कम ४५५ कोटींच्या घरात जाईल. या सकारात्मक दृष्टिकोनातून बँक पुन्हा उभी राहील.शेतकऱ्यांना नव्याने कर्जपुरवठागेल्यावर्षी बँकेने शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला नाही. त्याआधीच्या वर्षात शासनाच्या हमीवर महाराष्ट्र स्टेट को-आॅप. बँकेकडून जिल्हा बँकेला मिळालेले ७५ कोटी शेतकऱ्यांना वाटप केले. त्यावेळी वसुली ८१ कोटी रुपयांची झाली होती. मार्चपर्यंत जे शेतकरी थकीत कर्जाचे देय करेल, त्यांनाच कर्जपुरवठा करण्यात येईल, असे बँकेचे धोरण आहे. ठेवीदारांचा तगादाबँकेकडे ८६९ कोटींच्या ठेवी आहेत. पण रिझर्व्ह बँक आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ठेवीदारांना ठेवी परत करणे शक्य नाही. अनेक ठेवीदारांना माहिती आहे की, ठेवी सुरक्षित आहेत. पण शहरी भागातील ठेवीदार ठेवी परतीसाठी तगादा लावतात. त्यांनाही काही वेळ थांबावे लागेल. दोन महिन्यात बँकेची परिस्थिती सुधारल्यानंतर ठेवीदारांचा विचार होऊ शकतो. (प्रतिनिधी)बँकेचा कारभार सुधारला तरच चमत्कार शक्यकेंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाकांक्षी निर्णय घेत विशेष पॅकेजच्या माध्यमातून नागपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला आहे. हे पॅकेज मंजूर करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फार मोठे प्रयत्न करावे लागले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यास मदत होईल. पण बँकेला आणि या बँकेवर प्रभुत्व असलेल्या नेत्यांना आपली मानसिकता बदलावी लागेल. शेतकऱ्यांच्या हितापेक्षा व्यक्तिगत स्वार्थ आणि राजकारणाचे साधन म्हणून या बँकेचा वापर होत असेल तर शेकडोवेळा असे पॅकेज दिले तरी काहीच उपयोग होणार नाही. शेतकऱ्यांचे हित आणि स्वच्छ कारभार असेल तरच डबघाईस आलेली ही बँक पुन्हा नव्या दमाने उभी राहील, अशी अपेक्षा सहकारी क्षेत्रातील प्रामाणिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.