शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करणार प्रबोधन

By admin | Updated: August 27, 2016 00:55 IST

लाचखोरीला लगाम घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून येत्या गणेशोत्सवामध्ये जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

पुणे : लाचखोरीला लगाम घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून येत्या गणेशोत्सवामध्ये जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे. एसीबीच्या ‘स्टँडी’द्वारे शहरातील महत्त्वाच्या गणेश मंडळांसमोर अधिकारी आणि कर्मचारी लोकांचे प्रबोधन करणार आहेत. शक्य झाल्यास यामध्ये मंडळांचीही मदत घेतली जाणार असल्याची माहिती अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.काही महिन्यांपासून एसीबीच्या पुणे विभागाने जनजागृतीवरही अधिक भर दिला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध नागरिकांनी तक्रारी द्याव्यात, याकरिता एसीबी थेट नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. एसीबीने प्रभात फेरीची ठिकाणे, गर्दीची ठिकाणे यासोबतच बाजार पेठा, मॉल्स, सिनेमागृहे, बागा अशा ठिकाणी ‘स्टँडी’ हा उपक्रम राबवून जनजागृती केली आहे. एसीबीचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उभे राहून लोकांना लाचखोरीचे तोटे समजावून सांगतानाच त्यांना पुढे येऊन लाचखोरांविरुद्ध तक्रारी देण्याचे आवाहन करतात. आता हाच उपक्रम गणोशोत्सवामध्ये राबविण्यात येईल. शासकीय कामांसाठी द्याव्या लागणाऱ्या लाचेमुळे अनेकदा लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. चिरीमिरीसाठी लोकांची कामे अडवून ठेवली जातात. अनेकदा इच्छा नसतानाही लाच देण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. अशा वेळी एसीबीकडे तक्रारी दिल्यास तक्रारदारांना न्याय देता येईल. म्हणून एसीबीचे काम, नेमकी लाच कशी असते, ती कोणकोणत्या कामांसाठी मागितली जाते, त्याचा काय परिणाम होतो याची माहिती लोकांना देण्यात येईल. पोलिसांनी या उपक्रमासाठी शहरातील प्रमुख गणेशोत्सव मंडळांची यादी तयार केली आहे.>काही निवडक मंडळांसमोर एसीबी ही जनजागृती करणार आहे. महत्त्वाच्या मंडळांच्या परिसरात विभागाचे खास स्टॉल लावून तेथून जनजागृती व पत्रके वाटली जाणार आहेत. एसीबीचे दूरध्वनी क्रमांक, व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक, ई-मेल, वेबसाईट यांचीही माहिती दिली जाणार असल्याचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले.