Aditi Tatkare News: राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. तब्बल २३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण होणार असून, विभागातील लाखो पदांना मान्यता देण्यात आली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे विभागाच्या कामकाजास मोठी गती मिळणार आहे, असा विश्वास आदिती तटकरे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये व्यक्त केला.
२३ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विभागाचे सक्षमीकरण : हजारो पदांच्या पुनर्रचनेला मान्यता ! महिला व बाल विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध ११ मार्च २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला होता. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. सन २००३ नंतर, म्हणजेच तब्बल २३ वर्षांनंतर विभागाच्या रचनेत हा मोठा बदल करण्यात आला असून, या ऐतिहासिक निर्णयामुळे विभागाच्या कामकाजास मोठी गती मिळणार आहे, असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
२,२१,३२८ मानधनी पदांना मान्यता
- बदलत्या गरजा लक्षात घेता, उच्चस्तरीय समितीने प्रस्तावित केलेल्या १६५ नवीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
- विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांतील गट-अ ते गट-ड मधील एकूण ८६६९ नियमित पदे , २८४३ बाह्यस्त्रोत पदे तसेच, १,१०,६६४ अंगणवाडी सेविका व १,१०६६४ अंगणवाडी मदतनीस अशा एकूण २,२१,३२८ मानधनी पदांना मान्यता दिली आहे.
- महाराष्ट्र समाज कल्याण बोर्ड, मुंबई येथील १५ कार्यरत आणि ३२ प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांचे आता आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्या अधिनस्त रिक्त पदांवर समकक्ष वेतनात समायोजन केले जाणार आहे.
दरम्यान, सन २००३ पासून प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लागल्यामुळे विभागाच्या कामकाजाला अधिक कठीण मिळणार आहे. तसेच, ग्रामीण व शहरी भागातील महिला व बालकांसाठीच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल हा मला विश्वास आहे. या माध्यमातून विभागातील महा सुधारणा (Mega Reform) टीमचा एक भाग होता आले याचा मला आनंद व अभिमान वाटतो. या सुधारणा समाजातील गरजू, वंचित घटकांसाठी सदैव फलदायी व उपयुक्त ठरतील हा मला विश्वास आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.
Web Summary : After 23 years, the Women and Child Welfare Department sees empowerment. Lakhs of positions approved, promising faster operations. 2,21,328 honorary posts get approval, alongside restructuring for effective scheme implementation in rural and urban areas.
Web Summary : 23 वर्षों बाद, महिला एवं बाल कल्याण विभाग सशक्त। लाखों पदों को मंजूरी, तेजी से संचालन का वादा। 2,21,328 मानद पदों को मंजूरी, ग्रामीण और शहरी क्षेत्रों में प्रभावी योजना कार्यान्वयन के लिए पुनर्गठन।