शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केज कल्चर प्रणालीतून रोजगाराच्या संधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 05:17 IST

पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धनाच्या (केज कल्चर प्रणाली) माध्यमातून सुमारे एक लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

मुंबई : पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धनाच्या (केज कल्चर प्रणाली) माध्यमातून सुमारे एक लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्या माध्यमातून महाराष्ट्राला मत्स्यव्यवसायात अव्वलस्थानी नेण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.तारापोरवाला मत्स्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जानकर बोलत होते. या वेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, मत्स्यविकास आयुक्त मधुकर गायकवाड, महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे कार्यकारी संचालक अरुण शंदे उपस्थित होते. जानकर म्हणाले की, केज कल्चरच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा प्रमुख उद्देश असून, त्या माध्यमातून रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध होतील. देशात आंध्र प्रदेश मत्स्यव्यवसायात अव्वल स्थानावर असून, महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे. येत्या काळात महाराष्ट्राला देशात मत्स्यव्यवसायात अव्वल क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे जानकर यांनी या वेळी सांगितले. आदिवासी असलेला कातकरी समाज हा मत्स्यव्यवसायात असून, मत्स्य व्यवसायाच्या कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांचे जीवनमान उंचावण्यात येणार असल्याचे जानकर यांनी या वेळी सांगितले. खोतकर या वेळी म्हणाले की, गोड्या पाण्यातील मत्स्यउत्पादन १.५ मेट्रिक टन असून, येत्या वर्षात ते दुपटीने वाढवून ३ मेट्रिक टनापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे खोतकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)