शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी रुग्णालयांतील कर्मचारी १९ ऑगस्टला राज्यव्यापी संपावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 06:40 IST

खासगीकरणाविरोधात राज्यव्यापी संपाचा इशारा

मुंबई : सरकारी रुग्णालयांच्या खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांनी १९ ऑगस्टला एकदिवसीय राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे. राज्यातील १७ वैद्यकीय महाविद्यालये आणि सरकारी रुग्णालयांतील कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.सरकारी रुग्णालयांत रिक्त जागांवर कंत्राटी पद्धतीने खासगी कर्मचारी नेमण्याचा सरकारचा विचार आहे. सरकारी रुग्णालयातील सेवांच्या खासगीकरणाला चतुर्थ श्रेणी कामगारांचा विरोध आहे. रिक्त जागांवर निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना संधी द्यावी, बदली कामगारांना सरकारी सेवेत सामावून घ्यावे, अशी या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदनही देण्यात आले होते, मात्र त्याची दखल न घेतल्याने कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.याविषयी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी संघटनेचे सरचिटणीस चंद्रकांत पाटणे म्हणाले की, सरकार केवळ आश्वासने देत आहे. त्यात रुग्णालयातील वैद्यकीय सेवांचे खासगीकरण करण्याच्या विचारात आहे. याला आमचा विरोध आहे. जे.जे. रुग्णालयातील कर्मचारी संघटनेच्या म्हणण्यानुसार, या रुग्णालयात सद्य:स्थितीत बाराशे कर्मचारी कार्यरत आहेत. यातील ७३४ कर्मचारी बदली कामगार आहेत.‘रिक्त पदे कंत्राटी तत्त्वावर भरू नका’राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघाचे मुंबई जिल्हा सरचिटणीस बापूराव वाघमारे यांनी सांगितले की, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयांतर्गत येणाºया सरकारी रुग्णालयांत कर्मचाºयांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे रिक्त जागा तातडीने भराव्यात, अशी मागणी आहे. मात्र राज्य सरकार रिक्त जागा खासगी कंत्राटदारामार्फत भरण्याच्या विचारात आहे. याला आमचा विरोध आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय