शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सर्व नगरपालिकांचे कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 03:00 IST

विविध मागण्यांवर शासनाने तोडगा काढला नसल्याचा आरोप करत, कर्मचा-यांच्या नगरपालिका व नगर पंचायत कर्मचारी संघटना संघर्ष समितीने या बेमुदत संपाची हाक दिली आहे.

मुंबई : राज्यातील ३५९ नगरपालिका, तसेच नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांनी नव्या वर्षाची सुरुवातच बेमुदत संपापासून केली आहे. रोजंदारी कर्मचा-यांसह ग्रामपंचायत कर्मचा-यांचे समावेशन आणि सातव्या वेतन आयोगासारख्या विविध मागण्यांवर शासनाने तोडगा काढला नसल्याचा आरोप करत, कर्मचा-यांच्या नगरपालिका व नगर पंचायत कर्मचारी संघटना संघर्ष समितीने या बेमुदत संपाची हाक दिली आहे. या संपात अत्यावश्यक सेवांचाही समावेश केल्याची माहिती संघर्ष समितीचे नेते विश्वनाथ घुगे यांनी दिली.घुगे यांनी सांगितले की, नगर परिषद, तसेच नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाºयांना १ जानेवारी, २०१६ पासून विनाअट सातवा वेतन आयोग लागू करण्याची संघटनेची प्रमुख मागणी आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी २५ आॅगस्ट, २०१७च्या बैठकीत दिलेल्या आश्वासनानुसार नगर परिषदेमधील १० मार्च, १९९३ पूर्वीचे, तसेच २००० पूर्वीच्या सर्व रोजंदारी कर्मचाºयांना ३१ डिसेंबर, २०१८ पूर्वी कायम करावे, अशा विविध मागण्यांवर सरकारने तोंडी व लेखी आश्वासने दिली होती. मात्र, त्यानंतरही शासन त्याची अंमलबजावणी करत नसल्याने, संघर्ष समितीने टप्प्याटप्प्याने आंदोलन पुकारले होते. त्यात १५ डिसेंबरला राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतीबाहेर कामगारांनी राज्यव्यापी निदर्शने करत शासनाचे लक्ष वेधले होते.याकडे शासनाने दुर्लक्ष केल्यानंतर पुन्हा संघर्ष समितीने२९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत काळ्या फिती लावून काम करत शासनाला मागण्यांची आठवण करून दिली. या आंदोलनाची दखल न घेतल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही दिला होता, तरीही शासनाने मान्य मागण्यांची अंमलबजावणी न केल्यास १ जानेवारीपासून बेमुदत संप करणार असल्याचे घुगे यांनी स्पष्ट केले.आश्वासनांच्या अंमलबजावणीची मागणीसंपामुळे पाणीपुरवठा, साफसफाई तसेच अन्य सेवांवर परिणाम होणार असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागेल. मात्र, कोणत्याही नव्या मागणीसाठी हा संप कर्मचारी करत नसून, शासनानेच दिलेल्या लेखी आश्वासनांची अंमलबजावणी करण्याची संघर्ष समितीची मागणी आहे. वारंवार इशारा दिल्यानंतरही शासनाने मान्य मागण्यांची अंमलबजावणी केली नसल्याने संघर्ष समितीने नाइलाजास्तव अत्यावश्यक सेवांसह सर्व सेवा-सुविधा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे संघर्ष समितीने स्पष्ट केले.

टॅग्स :Strikeसंप