मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून सामनावरील तात्पुरती बंदीची केलेली मागणी हा अभिव्यक्तीस्वातंत्र्यावरील हल्ला आहे. तसेच देशात छुप्या पद्धतीने आणीबाणी लादण्याच्या दिशेने पडलेले पाऊल असावे, अशी आम्हाला भीती आहे, असे स्पष्ट उत्तर शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी निवडणुक आयोगाला दिले आहे. सामना हे एक जहाल विचारसरणीचे वृत्तपत्र जरुर आहे. पण निवडणूक आयोगाने घालून दिलेली आचारसंहिता आणि निवडणूक नियमांची चौकट याविषयी सामना आदरच करतो, असे या उत्तरात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
हे आणीबाणीच्या दिशेने पडलेले पाऊल- राऊत
By admin | Updated: February 20, 2017 04:11 IST