शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

राज्यात अवचित भारनियमनाचे संकट

By admin | Updated: October 2, 2014 00:15 IST

कोळसा, गॅसचा तुटवडा : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे बचावले

कोळसा, गॅसचा तुटवडा : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे बचावलेरत्नागिरी : कोळसा व गॅसच्या पुरवठ्यातील तुटीमुळे महावितरणला रोज सुमारे दोन हजार मेगावॅट वीज कमी मिळत आहे. महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पातून किमान ५५०० मेगावॅट वीज अपेक्षित असताना तेथून केवळ ४००० ते ४५०० मेगावॅट वीज मिळत आहे. त्यामुळे राज्यात भारनियमन सुरू करण्यात आले आहे. महानिर्मितीला दररोज किमान ३२ कोळशांचे रेक्स लागतात. परंतु प्रत्यक्षात फक्त १५ ते १६ रेक्स उपलब्ध होतात. सध्या खापरखेडा, पारस, भुसावळ या केंद्रात केवळ एक ते अर्ध्या दिवसांचा कोळसा शिल्लक राहिला आहे. चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात अडीच दिवसांचा कोळसा शिल्लक राहिला आहे. महानिर्मितीच्या सर्वच विद्युत केंद्रातील कोळशाची स्थिती बिकट असल्याने वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. याशिवाय इंडिया बुल्सकडून कोळशा अभावी २७० मेगावॅट वीज कमी उपलब्ध होत आहे. कोळशाबरोबर गॅस उपलब्धतेच्या अडचणी भासत आहे. गॅस अभावी १९५० मेगावॅटचा रत्नागिरी गॅस प्रकल्प बंद आहे. उरण गॅस केंद्रात १५० मेगावॅट वीजनिर्मीती कमी झाली आहे. याशिवाय अदानी प्रकल्पातून २५०० मेगावॅट वीज अपेक्षित असताना गेल्या काही दिवसात तेथून वेगवेगळ्या कारणामुळे केवळ १५०० ते १७०० मेगावॅट वीज मिळत आहे. गेल्या १५ दिवसांपासून विजेच्या मागणी व पुरवठ्यात मेळ घालण्यात अडचणी निर्माण झाल्याने राज्यात भारनियमन सुरू करण्यात आले आहे. फिडर्सनिहाय भारनियमन करण्यात येत आहे. ड वर्गापासून पुढे भारनियमन करण्यात येत असल्यामुळे कोकण परिमंडलास मात्र दिलासा मिळाला आहे.राज्यात १५ दिवसापूर्वी विजेची मागणी १४,५०० ते १५,५०० मेगावॅट इतकी होती मात्र आता मागणीत वाढ झाली आहे. १६,५०० ते १६,८०० मेगावॅट इतकी वीजेची मागणी होत आहे. गतवर्षी याच दिवसात १२,२०० मेगावॅट इतकी मागणी होती, मात्र त्या तुलनेत सध्याची मागणी तब्बल ४,६०० मेगावॅअ इतकी वाढली आहे. विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणला केंद्रीय विद्युत एक्सचेंजमधून दररोज १,००० ते १,४०० मेगावॅट वीज घेतली जाते. याशिवाय पारदर्शक निविदा प्रक्रियेतून रोज ३०० मेगावॅट विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. उरण गॅस केंद्राला बाजारातून गॅस उपलब्ध करून देण्यासाठीही महावितरण प्रयत्न करीत आहे, जेणेकरून १०० ते १५० मेगावॅट जादा वीज उपलब्ध होई शकते. (प्रतिनिधी)