शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गोमणीत दारूविक्रीविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:42 IST

मुलचेरा तालुक्यातील गोमणी हे गाव मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट आहे. १ सप्टेंबरपासून सदर गावात दारूविक्री पूर्णत: बंद करून याविरोधात मोहीम राबविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांनी घेतला निर्णय : विक्रेत्यांच्या विरोधात धडक मोहीम राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोमणी : मुलचेरा तालुक्यातील गोमणी हे गाव मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट आहे. १ सप्टेंबरपासून सदर गावात दारूविक्री पूर्णत: बंद करून याविरोधात मोहीम राबविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.यासंदर्भात मुक्तिपथ अभियानाच्या माध्यमातून शुक्रवारी गावात बैठक पार पडली. या बैठकीला गोमणीच्या उपसरपंच एस.बी.मरापे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बंडू शेंडे, पोलीस पाटील पी.एम.चौधरी, ग्रा.पं.सदस्य एस.एम.चौधरी, मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक एस.पी.झरकर आदी उपस्थित होते.गोमणी गावात एकेकाळी दारूचे लोट वाहत होते. आताही दारूविक्री काही प्रमाणात सुरू आहे. गावातून दारू व अवैध धंदे पूर्णत: हद्दपार करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. या बैठकीत दारूविक्री व सेवनामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत आहे. महिला व शाळकरी मुलांनाही त्रास होतो. त्यामुळे गावातून १०० टक्के दारू हद्दपार करण्याचा निर्णय सर्वनूमते घेण्यात आला. या सभेला गावातील १०० ते १२५ नागरिक उपस्थित होते.गावात झालेली दारूबंदी ही मुक्तिपथ अभियानाच्या जनजागृतीचे यश आहे. ग्रामस्थ व महिलांच्या पुढाकाराने दारूविक्री विरोधात हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. भविष्यात या गावाची नवनिर्मितीकडे वाटचाल होणार आहे, असा विश्वास गोमणीचे मुख्य परिवर्तक सोमेश झरकर यांनी व्यक्त केला आहे. गावात कोणत्याही इसमाने दारूची विक्री केल्यास संबंधितांवर कारवाई करून त्याची पोलिसाकडे रवानगी करण्याचा निर्णय महिलांनी घेतला.

टॅग्स :liquor banदारूबंदी