शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी आॅनलाइन प्रवेशाचा गोंधळ सुरूच

By admin | Updated: July 31, 2016 04:45 IST

अकरावीचे वर्ग १ आॅगस्ट पासून सुरू होणार आहेत. मात्र, अजूनही अकरावी प्रवेशाचा गोंधळ मिटलेला नाही.

मुंबई : अकरावीचे वर्ग १ आॅगस्ट पासून सुरू होणार आहेत. मात्र, अजूनही अकरावी प्रवेशाचा गोंधळ मिटलेला नाही. महत्त्वाचे म्हणजे आॅफलाइन प्रवेश मिळतील, या आशेवर काही पालकांनी विद्यार्थ्यांची प्रवेश पूर्व आॅनलाइन नोंदणी केलेली नाही, परंतु आॅनलाइन प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आता अखेरची संधी देण्यात आली असून, याबाबतची माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांची शनिवारी दादर येथील छबिलदास शाळेत झुंबड उडाली होती.आॅनलाइन प्रवेश अनिवार्य करण्यात आले असले, तरीदेखील आॅफलाइन पद्धतीने प्रवेश मिळवता येतील, या आशेवर असलेल्या अनेक पालकांनी विद्यार्थ्यांची आॅनलाइन नोंदणी केलेली नाही. मात्र, आॅफलाइन पद्धतीने प्रवेश मिळणारच नाही, म्हटल्यावर पालकांनी आता मार्गदर्शन केंद्राबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. १ आॅगस्टपासून कॉलेज सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून ३० आणि ३१ जुलै रोजी आॅनलाइन प्रवेशाची नोंदणी होणार होती. मात्र, तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करत, शासनातर्फे १ आणि २ आॅगस्टला पुन्हा एकदा आॅनलाइन नोंदणीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ४ आॅगस्ट रोजी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची यादी लावण्यात येणार आहे. दरम्यान, शहर आणि उपनगरातील अनेक महाविद्यालयांमध्ये जागा शिल्लक असून, त्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असे मार्गदर्शन केंद्राकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)>दीड हजारहून अधिक विद्यार्थ्यांना टोकन मुंबई, ठाणे विभागात मार्गदर्शक केंद्र आहेत. मात्र, पालक आणि विद्यार्थ्यांची अधिक गर्दी दादर येथील छबिलदास शाळेत शनिवारी झाली होती. विरार, वसई, टिटवाळा, बदलापूर येथील विद्यार्थ्यांनीही दादर येथील केंद्रावर चौकशीसाठी गर्दी केली होती. शनिवारी या केंद्रात दीड हजारहून अधिक विद्यार्थ्यांना आॅनलाइन नोंदणीसाठी टोकन देण्यात आले.मार्गदर्शन पुस्तिकांची मागणीआॅनलाइन नोंदणी मार्गदर्शनासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे अर्ज व माहिती पुस्तिका देण्यात आली आहे. मात्र, अनेकांनी ही पुस्तके घेतलेली नाहीत. त्यामुळे मार्गदर्शक पुस्तिकांची मागणी वाढली आहे. या पुस्तिकेचा अभ्यास करूनच आॅनलाइन नोंदणी करा, असे आवाहन मार्गदर्शन केंद्राने विद्यार्थ्यांना केले आहे.विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना केलेल्या चुका दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. याकरिता विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्रात दाखल होत चौकशी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही केंद्रात दाखल होण्याऐवजी स्थानिक परिसरातील केंद्रातच विद्यार्थ्यांनी यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन केंद्रे उघडण्यात आली आहेत. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.विचारपूर्वक महाविद्यालय निवडाविद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये, म्हणून प्रवेशपूर्व आॅनलाइन नोंदणी करण्याची संधी पुन्हा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता पालकांनी काळजीपूर्वक नोंदणी करावी. महाविद्यालयांचे पर्याय निवडताना विचार करावा, जेणेकरून प्रवेशासंबंधी आणखी मनस्ताप होणार नाही.- बी. बी. चव्हाण, शिक्षण उपसंचालक