शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशाची चावी विद्यार्थ्यांच्या हाती, महाविद्यालयांआधी विद्यार्थ्यांची संमती आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 04:48 IST

अकरावी प्रवेशादरम्यान महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी प्रशासनाने आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत यंदा बरेच बदल सुचविले आहेत. त्यात प्रवेश अद्ययावत करण्याची चावी महाविद्यालयांकडून काढून विद्यार्थ्यांना सोपवण्यात येणार आहे.

मुंबई  - अकरावी प्रवेशादरम्यान महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी प्रशासनाने आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतयंदा बरेच बदल सुचविले आहेत. त्यात प्रवेश अद्ययावत करण्याची चावी महाविद्यालयांकडून काढून विद्यार्थ्यांना सोपवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या परवानगीशिवाय महाविद्यालयांना प्रवेश अद्ययावत करता येणार नसल्याचे शिक्षण विभागातील एका अधिका-याने सांगितले आहे.अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत गुणवत्ता यादी जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागत होता.यात महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या संमतीशिवाय केवळ रिक्त जागा भरण्यासाठी प्रवेश निश्चिती दाखवण्यात येत होती. त्यामुळेविद्यार्थीप्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडत होते. त्यांना नाइलाजास्तव संबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागत होता. तशा तक्रारीही शिक्षणउपसंचालक कार्यालयाकडे आल्या होत्या. त्याची दखल घेत नवा बदल मंजूर झाल्याची माहिती शिक्षण विभागातील एका अधिका-याने‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. या माहितीनुसार, महाविद्यालयांनी प्रवेश अद्ययावत करण्यासाठी त्यास विद्यार्थ्यांकडून आॅनलाइन परवानगी घेणे अपेक्षित असेल. त्याशिवाय महाविद्यालयाला प्रवेश अद्ययावत करता येणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन आयडीवरून गुणवत्ता यादीत मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यास पसंती दर्शवावी लागेल. परिणामी, विद्यार्थ्यांची फसवणूक थांबेल.असा असेल बदलविद्यार्थ्यांनी अर्ज केल्यानंतर अकरावी महाविद्यालय प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना आॅनलाइन ‘प्रोसिड’ या नव्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर विद्यार्थ्याचा महाविद्यालयातील प्रवेश निश्चित होईल. त्यानुसार महाविद्यालयांना प्रवेश अद्ययावत करता येतील.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्र