शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
4
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
5
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
6
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
7
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
8
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
9
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
10
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
11
“सगळ्याच योजना कायम चालतात असे नाही”; ‘आनंदाचा शिधा’ योजनेवरील अजित पवारांचे विधान चर्चेत
12
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
13
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?
14
KL राहुलनं सेंच्युरीत जमलं नाही ते केलं; पण क्लासला दांडी मारून आलेल्या चाहत्यांसमोर नको ते घडलं
15
प्लॅन A विष, प्लॅन B गोळीबार... नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोचा बॉयफ्रेंडसह भयंकर कट
16
...तर मग लाडक्या बहिणींना योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत का? अजित पवारांनी दिले उत्तर
17
३० वर्षांनी शुक्र-शनीचा समसप्तम योग; ११ ऑक्टोबरला ५ राशींना लाभ, इतरांनी घ्या 'ही' काळजी!
18
तुम्हीही गृह कर्ज काढलंय? CA च्या ५ स्मार्ट हॅक्सने ५० लाखांच्या कर्जात वाचवा तब्बल ३६ लाख रुपये
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींची दिवाळी गोड होणार! सप्टेंबरचे १५०० रुपये लवकरच मिळणार, तारीख आली समोर
20
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, भयंकर त्सुनामीचा इशारा

वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 06:18 IST

राज्यभरात निदर्शने, संप आजही सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महावितरणच्या कार्यक्षेत्रात अदानी, टोरंटोसारख्या खासगी कंपन्यांना वीज वितरणाचा परवाना देण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी वीज कामगार संघटनांनी पुकारलेल्या राज्यस्तरीय तीन दिवसीय संपात पहिल्याच दिवशी गुरुवारी ७० टक्के कामगार सहभागी झाले. महावितरणकडून वाटाघाटीसाठी कोणत्याच हालचाली नसल्याने संप   शुक्रवारी सुरूच राहणार असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले.

वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने राज्य सरकारने  मेस्मा लागू केला असला तरी कर्मचारी संपावर ठाम आहेत. महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणच्या वीज कामगारांनी दिवसभर राज्यभरातील विभागीय कार्यालयांवर निदर्शने केली. संपामुळे महामुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी काही काळ वीज पुरवठा खंडीत झाल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. तर वीज पुरवठ्यावर कोणताही परिणाम  झाला नसल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.

आपत्कालीन नियंत्रण कक्षातून वीज पुरवठ्यावर नजर

वीज पुरवठ्याची जबाबदारी सांभाळणारे महावितरणमधील सुमारे ६२ टक्के अभियंते, अधिकारी व कर्मचारी संपामध्ये सहभागी झालेले नाहीत. मुंबई मुख्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष उभारण्यात आला असून तेथून राज्यभरातील वीजपुरवठ्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. 

संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, २० हजार बाह्यस्रोत तांत्रिक कर्मचारी, महावितरणच्या निवड सूचीवरील कंत्राटदार व कर्मचाऱ्यांची सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र, आदी ठिकाणी तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे.

कंत्राटी कामगारांच्या खांद्यावर कामाचा भार : २०२५ पर्यंत ग्राहकांच्या संख्येत ३ कोटी १७ वाढ झाली आहे. मात्र, वाढीव ग्राहकांना सेवा देण्यासाठी ६४८ उपविभाग आहेत. विभागात कर्मचारी व अभियंत्यांची ८१,९०० मंजूर पदे आहेत. परंतु अनेक मंजूर पदावर कंत्राटी पद्धतीने कामगारांची भरती करून कामकाज चालविण्यात येत असल्याचे सांगत कामगार संघटनांनी रोष बोलून दाखविला.

English
हिंदी सारांश
Web Title : Electricity workers strike against privatization; 70% participate despite MESMA.

Web Summary : Electricity workers across Maharashtra strike against privatization, with 70% participating despite MESMA. Power outages reported, but company denies major disruptions. Contract workers shoulder increased workload.
टॅग्स :mahavitaranमहावितरण