शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
2
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
3
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
4
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
5
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
6
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
7
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
8
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
9
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
10
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
11
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
12
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
13
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
14
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
15
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
16
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
17
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
18
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
19
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
20
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट

वीज आणखी महागणार; महावितरणची आयोगाशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 06:49 IST

आता दरवृद्धीची याचिका दरवर्षी न होता पाच वर्षांसाठी मंजूर केली जाते. नियामक आयोगाने २०००मध्ये विभागीय मुख्यालयांमध्ये जनसुनावणी करून या याचिकेवर आदेश जारी केला होता.

- कमल शर्मा लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील वीज आणखी महाग करण्याची तयारी सुरू झाली आहे. वीज वितरण कंपनी महावितरणने यासंदर्भात गुरुवारी राज्य विद्युत नियामक आयोगाशी चर्चा केली. या बैठकीनंतर आयोगाने कंपनीला दरवृद्धीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. 

आता दरवृद्धीची याचिका दरवर्षी न होता पाच वर्षांसाठी मंजूर केली जाते. नियामक आयोगाने २०००मध्ये विभागीय मुख्यालयांमध्ये जनसुनावणी करून या याचिकेवर आदेश जारी केला होता. नियमानुसार अडीच वर्षांपर्यंत महावितरण दरवृद्धीची मागणी करू शकत नाही. ही मुदत ३० नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने दरवृद्धीची मंजुरी मिळविण्यासाठी याचिका दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात अधिकारी उघडपणे काही बोलायला तयार नाहीत. परंतु, विश्वसनीय सूत्रांनुसार गुरुवारीच कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियामक आयोगात जाऊन मिड टर्म पिटीशन (दर वृद्धी याचिका) दाखल करण्याबाबत चर्चा केली. आयोगाने कंपनीला ३० नोव्हेंबरपूर्वी याचिका दाखल करण्यास सांगितले आहे. आयोग विविध शहरांमध्ये जनसुनावणी घेऊन हा निर्णय घेणार आहे की, नागरिकांवर दरवाढ लादली जाईल, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

महावितरणच्या अपयशाचे खापर नागरिकांवर प्रस्तावित वीज दरवाढ ही महावितरणचे अपयश आहे. महावितरणमधील सूत्रांच्या दाव्यानुसार कोविड - १९ संक्रमण व लॉकडाऊनमुळे प्रचंड नुकसान झाले. थकबाकी वाढली. परंतु, कंपनी वसुली करू शकली नाही. कोविडच्या काळात एकूण थकबाकी ७० हजार कोटी रुपये होती. आजही थकबाकी तितकीच आहे. कंपनी सरकारकडून पाणीपुरवठ्याचे १,८०० कोटी व पथदिव्यांचे ६,५०० कोटी वसूल करू शकलेली नाही. महावितरण महागड्या वीज खरेदीचा हवाला देत आहे. परंतु, कंपनी नागरिकांकडून अगोदरच इंधन समायोजन शुल्काच्या स्वरुपात भरपाई करत आहे. 

अशी आहे थकबाकीघरगुती     १,९०० कोटी वाणिज्यिक     ४०० कोटी औद्योगिक     ७५० कोटी कृषी     ४५,७०० कोटी पाॅवरलूम     ४०० कोटीपाणीपुरवठा     १,८०० कोटीपथदिवे     ६,५०० कोटी

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण