शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिल थकले, पाणी रोखले, महावितरणला टाळे ठोकण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:34 IST

अगोदरच कामगारांचा पगार आणी सुविधा पुरविताना दमछाक झालेल्या भिगवण ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा करणा-या योजनेचा वीजबिल थकल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे.

भिगवण : अगोदरच कामगारांचा पगार आणी सुविधा पुरविताना दमछाक झालेल्या भिगवण ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा करणा-या योजनेचा वीजबिल थकल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांवर पाण्याचे संकट ओढवले आहे, तर पूर्वीच्या ग्रामपंचायतीने हे बिल थकविल्याने भिगवण गावावर ही नामुष्की ओढवल्याचे पदाधिकारी यांच्याकडून सांगितले जात आहे. नागरिकांना होणाºया त्रासामुळे वीजपुरवठा पूर्ववत करावा, अन्यथा वीजवितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे.भिगवण गावची लोकसंख्या प्रत्यक्षात २५ हजारच्या पुढे असल्याने त्यातच सणासुदीच्या तोंडावर पाणीपुरवठा होत नसल्याने इथल्या नागरिकांना टँकरने पाणी मागवावे लागत आहे. पाण्यासाठीचा कर देऊनही ही वेळ आल्याने हे नागरिक प्रचंड संतापले आहेत. ग्रामपंचायतीमध्ये दीड वर्षापूर्वी सत्ता परिवर्तन झाले. तेव्हापासून आजपर्यंत पाणीपुरवठा योजनेसाठीच्या वीजपुरवठ्याचे बिल कधीही थकले नसल्याचे सध्याचे सत्ताधारी सांगत आहेत. मात्र, आधीच्या ग्रामपंचायतीने बिल भरल्याने ३० लाख रुपयांची थकबाकी ग्रामपंचायतीवर आहे. ही थकबाकी शासनाने माफ करावी किंवा आमचे विजेचे बिल भरावे, अशी मागणी उपसरपंच प्रदीप वाकसे यांनी केली.याबाबत महावितरण कंपनीचे भिगवण कार्यालयाचे अभियंता अमोल चांगन यांनी जिल्हाभर वसुली कारवाई सुरू असल्याने वरिष्ठ कार्यालय यांच्या सूचनेनुसार या परिसरातील सात ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा बंद केला असल्याचे सांगितले. तसेच, काही ग्रामपंचायतने बिलाची काही प्रमाणात थकबाकी भरल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार असल्याचे सांगितले.>कारवाई अन्यायकारकतीस लाख रुपयांची थकबाकी होत असताना त्याकाळात कारवाई करताना महावितरणचे अधिकारी काय झोपा काढत होते का, आम्ही सत्तेवर येऊन दोन वर्षे झाली आहेत. आम्ही ५ लाख ५० हजार बिल भरले असताना पाठीमागे राहिलेल्या थकबाकीसाठी सणासुदीच्या कालावधीत केलेली कारवाई अन्यायकारक आहे. महावितरणने यावर विचार करुन तातडीने वीजपुरवठा पूर्ववत केला नाही, तर आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असे उपसरपंच प्रदीप वाकसे यांनी सांगितले.