शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे विधान असंवेदनशील नव्हते, तर...", कर्जमाफीबद्दलच्या वादग्रस्त विधानावर बाबासाहेब पाटलांचा खुलासा
2
VIDEO: "निवडून यायचं म्हणून आम्ही आश्वासने देतो"; सहकार मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर चोळलं मीठ, म्हणाले, "वेळ मारण्यासाठी..."
3
वयाच्या २३ व्या वर्षी 'शतकी रोमान्स'चा सिलसिला! यशस्वी जैस्वालनं कॅप्टन शुबमन गिलचा विक्रमही मोडला
4
छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
5
सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब
6
इंजिनिअरच्या घरात सापडलं मोठं घबाड; नोटांचा ढीग आणि सोनं-चांदीही जप्त
7
सावधान! दिवाळीत तुमच्या घरीही येऊ शकतं 'विष'; 'अशी' झटपट ओळखा भेसळयुक्त मिठाई
8
भारताचे मोठे पाऊल! काबुलमधील दूतावास पुन्हा सुरू होणार, अफगाणिस्तानशी 'दहशतवादा'वर चर्चा
9
निष्काळजीपणाचा कळस! सिरपनंतर आता गोळ्या... लाखो मुलांना दिलं टेस्टमध्ये फेल झालेलं औषध
10
“CJI गवई दलित असल्यानेच सवर्णाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी”: रामदास आठवले
11
डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक धक्का देणार! H-1B व्हिसा नियमांमध्ये आणखी बदल करण्याची तयारी
12
Yashasvi Jaiswal Record : यशस्वीचा मोठा पराक्रम; गांगुली- द्रविडसह गिल अन् विराटलाही टाकले मागे
13
LG Electronics IPO: एलजी इलेक्ट्रॉनिक्स आयपीओचं आज अलॉटमेंट, तुम्हाला मिळालेत का शेअर्स? कसं चेक कराल?
14
हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."
15
"ते माझ्यावर हसले...", ऑफिसमध्ये मानसिक आरोग्याबाबत तरुणीला आला वेदनादायी अनुभव
16
दिवाळी बोनसवर किती टॅक्स? रोख रक्कम, मिठाई की गिफ्ट व्हाउचर; कर नियमांबद्दलच्या 'या' चुका टाळा!
17
संजय राऊतांच्या गैरहजेरीत बैठका! ‘मातोश्री’वर केली महत्त्वाची खलबते, ठाकरे बंधूंनी डावललं?
18
KL राहुलनं सेंच्युरीत जमलं नाही ते केलं; पण क्लासला दांडी मारून आलेल्या चाहत्यांसमोर नको ते घडलं
19
प्लॅन A विष, प्लॅन B गोळीबार... नवऱ्याचा काटा काढण्यासाठी बायकोचा बॉयफ्रेंडसह भयंकर कट
20
...तर मग लाडक्या बहिणींना योजनेचे १५०० रुपये मिळणार नाहीत का? अजित पवारांनी दिले उत्तर

‘रत्नागिरी गॅस’मधून वीजनिर्मिती सुरु

By admin | Updated: November 26, 2015 23:30 IST

पहिल्याच दिवशी ३०० मेगावॅट वीज : दोन वर्षांची प्रतीक्षा संपली

गुहागर : तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातून गुरुवारी सकाळी ८.३० वाजल्यापासून वीजनिर्मिती सुरू करण्यास सुरुवात झाली. सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा वीजनिर्मिती सुरू करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झाल्यानंतर दुपारी ३ वाजल्यापासून ३०० मेगावॅट वीज निर्मितीचा टप्पा गाठला.महाराष्ट्रावर असलेल्या भारनियमनाचे संकट दूर करण्यासाठी कोर्ट रिसीव्हरच्या ताब्यात असलेला २१५० मेगावॅट क्षमतेचा ‘एन्रॉन’चा दाभोळ वीज प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ आॅक्टोबर २००५ रोजी रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्प नावाने प्रकल्प सुरू झाला. अनेक वर्षे प्रकल्प बंद असल्याने वीजनिर्मिती सुरू करण्यात अनेक अडचणी आल्या. कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर प्रकल्पातून सरासरी १००० मेगावॅट वीजनिर्मिती होत होती. अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे अखेर डिसेंबर २०१३ पासून वीजनिर्मिती बंद करण्यात आली. केंद्र व राज्यातील सत्ता बदलानंतर प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी हा प्रकल्प सुरू होणार असल्याची घोषणा केली. ५०० मेगावॅट वीज खरेदी करण्याला रेल्वेकडून हिरवा कंदील दाखवण्यात आल्याने वीजनिर्मिती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी रेल्वेच्या वरिष्ठ समितीने प्रकल्पाला विशेष भेट देऊन यावर शिक्कामोर्तब केले. यातील ३०० मेगावॅट महाराष्ट्रातील रेल्वेसाठी, तर २०० मेगावॅट झारखंडमधील रेल्वेसाठी वापरली जाणार आहे.दरम्यानच्या काळात फक्त १०० मेगावॅटच वीज घेण्याबाबत रेल्वेकडून मागणी होत होती. एवढी कमी वीजनिर्मिती करणे तांत्रिक व आर्थिकदृष्ट्याही कंपनी प्रशासनाला परवडणारे नव्हते. वरिष्ठ पातळीवर बैठका होत होत्या. अखेर यावर निर्णय झाला. (प्रतिनिधी)टप्प्याटप्प्याने निर्मिती वाढलीगुरुवारी सकाळी ८.३० वाजता प्रथम ४० मेगावॅट सुरू करण्यात आली. प्रकल्पातून दोन वर्षे पूर्ण क्षमतेने टर्बाईनमधून वीजनिर्मिती झाली नसल्याने टप्प्याटप्प्याने वीजनिर्मिती वाढविण्यात आली. दुपारी ३ वाजेपर्यंत टप्पा ३ मधून ३०० मेगावॅट वीजनिर्मिती वाढविण्यात आली.महाराष्ट्राच्या परवान्यासाठी विलंबही वीज रेल्वेला देण्यासाठी केंद्रीय वीज नियामक आयोगाचा परवाना प्रथम मिळाला. मात्र, महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची मंजुरी मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे १ नोव्हेंबरचा वीजनिर्मितीचा मुहूर्त हुकला. आता हा परवानाही मिळाला आहे. झारखंडमधील परवाना बाकी असल्याने सद्य:स्थितीत ३०० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे आणि ती महाराष्ट्रातील रेल्वेसाठी वापरली जाणार आहे.