मुंबई : वीजग्राहकांना तत्पर व आॅनलाइन सेवा देण्यासाठी वीजग्राहक व कर्मचाऱ्यांकरिता महावितरणच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मोबाइल अॅप्सला चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ सात महिन्यांत सुमारे दहा लाख ग्राहकांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. या अॅपद्वारे आतापर्यंत १ कोटी ७० लाख ग्राहकांचे मीटर रीडिंग घेण्यात आले आहे, तसेच ७ लाख ४३ हजार ग्राहकांनी आपल्या वीजबिलांचा भरणा करण्यासाठी या अॅपचा वापर केला असून, सुमारे ४५ हजार ८१३ ग्राहकांना अॅपद्वारे नवीन वीजजोडणीदेण्यात आली आहे. तसेच राज्यातील सुमारे ३८ हजारांपेक्षा अधिक तांत्रिक कर्मचाऱ्यांनी ‘कर्मचारी मित्र अॅप’ डाउनलोड केले आहे. (प्रतिनिधी)
वीजग्राहकही ‘डिजिटल’
By admin | Updated: February 14, 2017 04:06 IST